Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/04/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव -( प्रतिनिधी )- जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि., राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज दि.२९ एप्रिल ला करण्यात आले होते. नेस्ले सामाजिक उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबीरात १३५ रूग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी, हर्षा नन्नवरे, तेजस पाटील, सुनिता सिसोदिया, सागर मसाने, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशांत चौधरी उपस्थितीत होते.

शिबिरात बी.पी, शुगर, ईसीजी तसेच इतर आवश्यक तपासण्या करून औषध वाटप करण्यात आल्या. डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याबरोबरच जीवनशैलीत बदल, आहार व व्यसनमुक्ती याबाबतही मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच वैजंताबाई शिरसाठ, प्रदिपसिंग पाटील, संजू प्रकाश लंगरे, समाधान धनगर, पृथ्वीराज पाटील, दिपक जाधव, दिपक चांभार, आशितोष माळी, रविंद्र धनगर उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी पाथरी ग्रामपंचायत व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, प्रशांत सुर्यवंशी, विक्रम अस्वार, अर्जून प्रसाद, सुशिल कदम, मुरलीधर नेटके यांनी परिश्रम घेतले. शिबिराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांनी व वृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासणी करून घेतली. अनेक रुग्णांनी गावातच डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्यामुळे वेळ व खर्च वाचत असल्याची प्रतिक्रीया दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

Next Post

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo