Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम

नाशिक(प्रतिनिधी)- आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. योजनांचा लाभ मिळण्याकरिता कुटुंबाची शिधापत्रिका अनुसूचित जमातीचा दाखला आणि आधार कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अनेकदा केवळ या कागदपत्रांच्या अभावी आदिवासी बांधव शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. हीच बाब विशेषत्वाने लक्षात घेऊन आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दिनांक १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देणेकामी विशेष मोहीम राबविली जात आहे.

शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासाठी लागणारे शुल्क हे केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) या योजनेतून अदा करण्यात येणार असल्याने स्थानिक स्तरावर संबंधिताना प्रस्तुत दाखले विनामुल्य उपलब्ध होणार आहे.विशेष मोहीम यशस्वी करण्याकरिता आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना आवाहन केले आहे. सर्व अपर आयुक्त यांच्या अखत्यारीत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व प्रांत अधिकारी यांच्यामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या कागदपत्राच्या पूर्ततेत शिधापत्रिका व जातीचा दाखला महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे दाखला नसणाऱ्या बांधवाना योजनेचा लाभ देता येत नाही.

विशेष मोहिमेमुळे सर्व आदिवासी बांधवाना त्यांचे दाखले यासोबतच आधार कार्ड देणे संबंधित यंत्रणांना कळविले आहे, असे श्री. हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी कळविले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विजय चौधरी नवे वायुदल प्रमुख

Next Post

भडगांव शहर व तालुक्यात डेंग्युसदृष्य विषाणुजण्य तापाची साथ उपाययोजनांची गरज

Next Post
भडगांव शहर व तालुक्यात डेंग्युसदृष्य विषाणुजण्य तापाची साथ उपाययोजनांची गरज

भडगांव शहर व तालुक्यात डेंग्युसदृष्य विषाणुजण्य तापाची साथ उपाययोजनांची गरज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo