Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/08/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे (PHC) जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, गरोदर महिलांना आणि लहान मुलांना चिखलातूनच कसरत करत आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, लोहारा येथील आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका (१०८) किंवा इतर वाहने आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
“आरोग्य केंद्रात उपचारासाठी येताना आधीच रुग्ण त्रासात असतो, त्यात या चिखलाच्या रस्त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल अधिकच वाढत आहेत. प्रशासनाने येथे तात्काळ खडीकरण करून रस्ता दुरुस्त करावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हा रस्ता जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने, संबंधित विभागाने या समस्येची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. रस्त्यावरील चिखल हटवून तिथे तातडीने मुरूम-खडी किंवा सिमेंटचे गट्टे टाकावी आणि भविष्यात येथे पक्का सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करावा, अन्यथा जनतेचा उद्रेक होऊन जनता रस्त्यावर उतरुन आंदोलनाच्या तयारीत आहे.अशी मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo