Thursday, February 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आनंदाची बातमी; ३३ वर्षांनंतर जळगाव महापालिका संपूर्ण कर्जमुक्त

Desk Team by Desk Team
28/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

March 28,
जळगाव प्रतिनिधी|

राज्यभरात कुठेही जळगाव महापालिकेचा विषय निघाला की, भ्रष्टाचार व कर्जाचा डोंगर हे दोन विषय आपसूकपणे निघाल्याशिवाय राहत नाही. जळगाव महापालिकेवर इतके कर्ज होते की, गत दोन पंचवार्षिकपासून जळगाव महापालिका कर्ममुक्त करु हा राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर प्रमुख विषय होता. जळगाव महापालिकेवर प्रचंड कर्जाचा ओझा असल्याने त्याचा विपरित परिणाम शहराच्या विकास कामांवर पडत होता, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही. मात्र आता तब्बल ३३ वर्षांनंतर महापालिका संपूर्ण कर्जमुक्त झाली आहे. हुडको कडून घेतलेल्या कर्जाचा शेवटचा ३ कोटींचा हप्ता महापालिकेने नुकताच भरला आहे.
१९८९ ते २००१ या कालावधीत तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध विकास योजनांसाठी ‘हुडको’ (हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) या वित्तीय संस्थेकडून १४१.३४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी महापालिकेकडून नियमितपणे व्याजासह मोठ्या रकमेचा भरणा झाला होता. तरीही हुडकोचे कर्ज फिटत नव्हते. कर्ज वाढतच होते. अखेर एकरकमी सेटलमेंट ठरवून कर्ज फेडण्याचे मंजूर करण्यात आले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार २५० कोटी ८३ लाख ३८ हजारांची रक्कम व यात दर महिन्याचे तीन कोटी व्याज गृहीत धरून २५३ कोटी ८३ लाख ३८ हजारांचे कर्ज राज्य शासनाने फेडले.हुडकोच्या कर्जापैकी राज्य शासन महापालिकेकडून ५० टक्के रकम वसूल करणार होती. त्यानुसार १२५ कोटी ४१ लाख ६९ हजारांची रक्कम महापालिकेस देय असलेल्या वस्तू व सेवाकर भरपाई अनुदान (जीएसटी)तून दरमहा तीन कोटींप्रमाणे आक्टोबर २०१९ पासून शासनाने वसूल करण्यास सुरवात केली होती. त्यानुसार मार्च २०२३ ला अखेरचा तीन कोटी रुपये राज्य शासनाने जीएसटीच्या अनुदानातून कपात केले आहेत. राज्य शासनाकडून महापालिकेला साडेबारा कोटी रुपयांचे जीएसटीचे अनुदान मिळणार होते. त्यात तीन कोटी राज्य शासन कपात करून ९ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळत होते. या अनुदानातून महापालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन, पेन्शन व उर्वरित रक्कम विकासकामांसाठी खर्च केली जात होती. मात्र, वेतन, पेन्शनवर मोठी रक्कम अनुदानातून खर्च केली जात असल्याने विकासकामांसाठी थोडी रक्कम शिल्लक राहत होती. आता या अनुदानात तीन कोटी रुपये दरमहा वाढणार आहेत.

Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावात भरधाव कंटेनरने पुन्हा वकीलाला चिरडले.

Next Post

जळगाव महानगरपालिका राजीनामा प्रकरण!

Next Post

जळगाव महानगरपालिका राजीनामा प्रकरण!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d