Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगावात भरधाव कंटेनरने पुन्हा वकीलाला चिरडले.

Desk Team by Desk Team
28/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

March 28|जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी धरणगावच्या वकिलाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली असताना आणखी एका वकिलाचा चिरडले आहे. भरधाव कंटेनरने वकिलाच्या दुचाकीला धडक दिल्याची घटना काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वकिलाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.योगेश जालमसिंग पाटील (रा. दादावाडी,जळगाव) असे मृत वकील यांचे नाव असून धडक देणार्‍या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील रहिवाशी असलेले योगेश पाटील हे जळगावातील दादावाडीत वास्तव्यास होते जिल्हा न्यायालयात ते वकिली करत असत. योगेश पाटील हे सायंकाळी त्यांच्या शाहु महाराज कॉम्प्लेक्समधील कार्यालयात असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला. फोन वरील चर्चेनुसार ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच. १९. सीई.६५११) निघाले. परंतु कोर्ट चौकाडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात त्यांच्या दुचाकीला रेल्वे स्थानकाकडून टॉवर चौकाकडून निघालेल्या भरधाव कंटेनरने धडक दिली.
या अपघातात अॅड. योगेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. केतन ढाकेंसह इतर वकील बंधुंनी जिल्हा रूग्णालय गाठले. त्यानंतर शहर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Desk Team

Previous Post

जळगावात चोरट्याने फोडला बियर बार, हजारोंची रोकड चोरली

Next Post

आनंदाची बातमी; ३३ वर्षांनंतर जळगाव महापालिका संपूर्ण कर्जमुक्त

Next Post

आनंदाची बातमी; ३३ वर्षांनंतर जळगाव महापालिका संपूर्ण कर्जमुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo