Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चाळीसगाव शहरासाठी ७ अत्याधुनिक औषध फवारणी यंत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांच्यामार्फत शहरभरात फवारले जाणार सोडियम हायपोक्लोराईड

चाळीसगाव – (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन – प्रशासन काम करत असताना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील कंबर कसली असून विविध माध्यमातून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या जनसेवा कार्यालयात गरजू रुग्णांसाठी मोफत दवाखाना, दररोज १५०० गरजू नागरिकांना घरपोच अन्नसेवा, ग्रामीण भागात १५० गावांना सोडियम हायपोक्लोराईड ची औषधी देण्यात येत आहे त्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी ७ अत्याधुनिक फवारणी यंत्र चाळीसगाव शहरासाठी आपल्या शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. सदर फवारणी यंत्र ही छोट्या ट्रॅकटर ला जोडून कार्यान्वित केली जात असून त्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेले सोडियम हायपोक्लोराईड औषध वापरले जात आहे.

चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात या सर्व ७ फवारणी यंत्रांची सुरुवात आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रॅकटर चालवून फवारणी  केली. यावेळी नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजू अण्णा चौधरी, गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, बाप्पू अहिरे, सोमसिंग आबा राजपूत, मानसिंग राजपूत, चिरागोउद्दीन शेख, चंदू भाऊ तायडे, सौ.विजयाताई भिकन पवार, सौ.विजयाताई प्रकाश पवार, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.संगीताताई गवळी, पंचायत समिती गटनेते संजू तात्या पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अमोल चौधरी, इमरान शेख,

संकटाच्या काळात शिंदी येथील शेतकऱ्यांचे दातृत्व

आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामोबदला दिली फवारणी यंत्र

चाळीसगाव तालुक्यासह राज्यभरात कोरोना निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जात असल्याने फवारणी यंत्र व औषध यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. चाळीसगाव शहरात फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत होती. त्यानुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी शिंदी येथील प्रगतीशील शेतकरी व भाजपाचे माजी पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब राउत यांना विनंती केली असता त्यांनी तात्काळ विनामोबदला फवारणी यंत्र  देण्याचे मान्य केले सोबतच शिंदी येथील शेतकरी गोरख जाधव, रमेश राउत, बाजीराव राउत, पांडुरंग आगोने, संतोष सोनवणे, विलास राखुंडे यांनी देखील आपले ट्रॅकटर व फवारणी यंत्र देण्याचे दातृत्व दाखविल्याने संकटकाळात बळीराजा मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर रायपूर ग्रामपंचायती मार्फत गावात निर्जंतुकरण फवारणी

Next Post

होम क्वारंटाईन नागरीक बाहेर फिरतांना दिसल्यास पोलीसांना कळविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

Next Post
कोरोना बंद मुळे  लघु वृत्तपत्र व पत्रकारांसह माध्यमात काम करणाऱ्या सर्व घटकानां विशेष आर्थिक पॅकेज द्यावे

होम क्वारंटाईन नागरीक बाहेर फिरतांना दिसल्यास पोलीसांना कळविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d