Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2025
in जळगाव
आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या दोन दिवसात अकादमीचे दोन स्कॉलर व दोन प्रतीथ यश कलावंतांचा सहभाग आहे.

आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्री दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीप प्रज्वलन आयटीसी संगीत अकादमीचे गुरु पं. ओंकार दादरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे सत्कार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केले. अकादमीच्या वतीने गुरु पं. ओंकार दादरकर यांनी रसिकांशी संवाद साधला. पहिल्या सत्रात अकादमीचा युवा कलाकार कौस्तव रॉय यांनी सरोद वादन सादर केले त्यांना तितकीच समर्थ तबल्याची साथ भोपाळ येथील रामेंद्र सिंह सोळंकी यांनी केली. कौस्तव यांनी राग श्री मध्ये जोड आणि झाला सादर करून रसिकांना रीजविले. त्यानंतर धमार व अध्दा तालात निबद्ध रचना सादर केल्या आणि रसिकांची वाहवा मिळाली.

यानंतर दुसऱ्या सत्रात अकादमीचे गुरु पंडित ओंकार दादरकर यांनी विलंबित झुमरा तालात मारुबिहाग रागातील बडा ख्याल “जागे मेरे भाग” सादर केले, त्यानंतर “पारी मोरी नाव” ही दृत एकतालातील बंदिश सादर केली. त्यानंतर विदुषी गिरीजादेवी यांनी स्वरबद्ध केलेला दादरा सादर केला हा दादरा मिश्र किरवाणी रागामध्ये निबंध होता “तुम बिन गाईन” सादर केला. त्यानंतर विदुषी माणिक वर्मा ज्या ओंकारच्या आत्या आहेत त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांनी गाऊन आजरामर केलेलं “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” हे भजन व संगीत कान्होपात्रा या नाटकातील अजरामर भैरवी “अगं वैकुंठीचे राया” गाऊन आपल्या मैफीलीची सांगता केली. ओंकार यांना तबल्यावर युवा तरुण आश्वासक तबलावादक तेजोवृष जोशी तर संवाद युनिवर अनंत जोशी यांनी अप्रतिम साथ सांगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अनघा नाईक गोडबोले यांनी उत्तमरीत्या केले व कार्यक्रमाची रंगत वाढवली. उद्या या महोत्सवाचा दुसरा दिवस असून यामध्ये प्रथम सत्रात नुपूर चांदोरकर खटावकर व आर्या शेंदुर्णीकर या जळगावच्या दोन युवा कलावंतांनी सादर केलेली गुरुवंदना व कथक नृत्याचा आविष्कार रसिकांना अनुभवास मिळेल. द्वितीय सत्रात अनुभव खामरू ह्या अकादमीच्या स्कॉलरचे शास्त्रीय गायन सादर होईल. तृतीय व समारोपाच्या सत्रात पं. रूपक कुलकर्णी यांच्या बासरी वादन सादर होईल. चुकवू नये अशा या कार्यक्रमास तमाम जळगावकर रसिकांनी आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन संगीत रिसर्च अकादमी व प्रतिष्ठानने केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खा. स्मिताताई वाघ यांचा पुढाकारः दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशनच्यावतीने आयोजन

Next Post

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

Next Post
श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo