Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/11/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
श्रीमती शकुंतला जैन यांचे संथारा व्रता सह निधन

जळगाव – ( प्रतिनिधी) – श्रद्धा कॉलनी ,जळगाव येथील रहिवासी श्रीमती शकुंतलाबाई कांतीलाल जैन यांचे आज ( २ नोव्हेंबर ) सकाळी ६:४०वाजता वयाच्या ७८व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, जावई, मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्या जैन इरिगेशनचे महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन आणि जळगाव पॉलिमर्स चे संचालक अविनाश जैन यांच्या आई होत. तसेच जैन श्री संघाचे संघपती दलीचंद जैन यांच्या स्नुषा तर जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या लहान भावजयी, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अशोक, अनिल, अजित, अतुल जैन यांच्या काकू होत .

सकाळी १०:१५ वाजता त्यांची अंतिम यात्रा श्रद्धा कॉलनी येथील निवास स्थानापासून निघाली त्यानंतर मोक्षधाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले. श्रीमती शकुंतलाबाई या जळगाव येथील रायसोनी परिवाराच्या कन्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्याने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्यांनी संथारा समाधी मरण व्रत स्वीकारले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात . त्यांच्या संथारा व्रतासह निधनाने जैन परिवारासह, आप्तेष्ट, नातेवाईक व विस्तारित परिवारात शोककळा पसरली आहे.

प्लास्टिक व्यवसायात योगदानाबद्दल गौरव       

भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. हा विशेष पुरस्कार मुंबई येथील ताज लॅण्डस् एंड वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला होता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

Next Post

४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार हिला सुवर्णपदक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo