Sunday, February 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
10/04/2024
in जळगाव, विशेष
Reading Time: 1 min read
उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?

 

मार्च महिन्यापासूनच जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात इतर ठिकाणीही ४०°-४२° सेल्सियस तापमानाची नोंद झाली,यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच डोळ्याला डोळे येणे, डोळे लाल होणे,कोरडेपणा येणे यासारख्या रुग्णांची संख्या वाढली आहे.. कडक उन्हामुळे आपल्या त्वचेला तर त्रास होतोच पण त्याचबरोबर डोळ्यांवर देखील सूर्याच्या उष्णतेचा गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत डोळ्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सूर्यापासून येणारे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण उन्हाळ्यात नकळत तुमच्या डोळ्यांना धोका देऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांत जळजळ, लालसरपणा, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. वाढते तापमान, सूर्यप्रकाश आणि धूळ यामुळे डोळ्यांना जास्त संसर्ग, कोरडेपणा आणि तणावाचा सामना करावा लागतो.

 

*उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास का होतो?*

डोळे हा आपल्या त्वचेचा, शरीराचा एक संवेदनशील भाग आहे. डोळे उष्णता जास्त सहन करू शकत नाही. याच कारणामुळे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा डोळ्यांवर परिणाम होतो. याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसांत हवा कोरडी पडते आणि त्याचवेळी हवेत धूळ आणि इतर प्रदूषणाचे कण उडू लागतात, जे डोळ्यांच्या संपर्कात आल्यावर डोळ्यांना त्रास होतो.

*उन्हाळ्यात डोळ्यांची लक्षणे-*

उष्णतेचा डोळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो, त्यामुळे त्याची लक्षणेही अनेक प्रकारची असतात.

1. डोळ्यांतून वारंवार पाणी येणे.
2. बाहेरून आल्यावर डोळे लाल होणे.
3. सूर्यप्रकाशात नीट न दिसणे.
4. सूर्यप्रकाशामुळे डोकेदुखीचा त्रास होणे.
5. धूळ आणि घाणीमुळे डोळ्यांत जळजळ होणे आणि खाज सुटणे.
6. डोळे कोरडे होणे.

*उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?*

उन्हाळ्यात ज्या प्रकारे आपण आपल्या त्वचेची आणि केसांची उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या सुरक्षेसाठीही काही पद्धतींचा अवलंब करावा लागतो. कारण उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हे टाळण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता.

1. वेळोवेळी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
2. बाहेर जाताना गॉगल वापरा.
3. धुळीच्या ठिकाणी जाऊ नका.
4. दुपारी शक्यतो घरीच राहा.
5. चेहऱ्यावर चष्मा लावून घाम येऊ देऊ नका.
6. डोळ्यांना वारंवार हात लाव नका.
7. वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या..

*तेजस्वी प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करा*

उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम डोळ्यांना तेजस्वी प्रकाशापासून वाचवा. यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी युव्हीपासून १०० टक्के संरक्षण देणारे (Polarized) मोठे सनग्लासेस घाला – धोकादायक युव्ही किरणांपासून संपूर्ण संरक्षण देणारे सनग्लासेस खरेदी करा. रॅपअराउंड फ्रेम्स खरेदी करण्यास प्राधान्य द्या, कारण त्या बाजूनेही संरक्षण देतात. जर तुम्हाला सनग्लासेस लावणे आवडत नसेल तर तुम्ही छत्री, स्कार्फ, टोपी यांसारख्या गोष्टी वापरून डोळ्यांचं रक्षण करू शकता.

 

*शरीर हायड्रेटेड ठेवा*

उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी शरीराला हायड्रेट ठेवा. यासाठी दिवसातून किमान 8 ते 9 ग्लास पाणी प्या. त्याचबरोबर फळे खा, यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील.

एसीच्या वातावरणात जास्त वेळ राहिल्यामुळे डोळे कोरडे होतात, तर पोहोण्याच्या तलावातील क्लोरिनयुक्त पाण्यामुळे बुबुळांना संसर्ग किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते. परिणामी डोळ्यांना खाज सुटते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत अशा घटकांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.


डॉ. जयेश वाल्हे
नेत्र चिकित्सक
श्री.पी.ई. तात्या पाटील आय हॉस्पिटल, जळगांव

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची 25 एप्रिल पर्यंत विशेष मोहिम

Next Post

लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी सी – व्हिजिल अँप; नागरिकांनो,आचार संहितेचं उल्लंघन झाले असेल तर तात्काळ कळवा

Next Post
लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी सी – व्हिजिल अँप; नागरिकांनो,आचार संहितेचं उल्लंघन झाले असेल तर तात्काळ कळवा

लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी यासाठी सी - व्हिजिल अँप; नागरिकांनो,आचार संहितेचं उल्लंघन झाले असेल तर तात्काळ कळवा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d