Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/04/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोल – (प्रतिनिधी) -विश्वाला शांती, करुणा, समता आणि मानवतेचा संदेश देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरातील भीमनगर येथे बुद्ध जयंती समितीची बैठक बुधवार, दि. २९ एप्रिल रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडली.

बैठकीत सर्वानुमते सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची बुद्ध जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी बंटी सरदार, खजिनदारपदी रोहित गायकवाड तर कार्याध्यक्ष म्हणून सागर सरदार, सचिन बोरसे, आकाश इंगळे आणि उमेश बोरसे यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश शिंदे, नितीन बोरसे, उमेश भाऊ शिंदे, रवी बोरसे, अभिषेक शिंदे, संघरत्न गायकवाड, लखन बनसोडे, प्रवीण बाविस्कर, अमोल शिंदे, मनोज बोरसे, राहुल बोडरे, प्रवीण खैरनार, दिनेश बोरसे, मनोहर बोडरे, जितेंद्र बोडरे आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धांच्या विचारांचा समाजात अधिकाधिक प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत बुद्ध जयंतीनिमित्त विविध सामाजिक व धम्म दानाचे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार दि. १ मे रोजी सकाळी खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, समाजात बंधुभाव आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश यातून दिला जाणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता एरंडोल शहरातून भव्य बौद्ध शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि धम्माच्या विचारांचा संदेश जनमानसात पोहोचविणारी ठरणार आहे. यात्रेनंतर रात्री ९ वाजता सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या बुद्धांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रम शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Next Post

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo