
जळगाव-(प्रतिनिधी ) -के.सी.ई. सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल जळगांव या शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. चारही हाउस् मधील विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे सुंदर सादरीकरण केले.

नेपच्यून हाऊस मधील विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाचा जन्म व “माखन चोर कृष्ण” हा नाट्यप्रसंग सादर करून गोपिकांबरोबर कृष्णाने केलेल्या खोड्या रंगतदार पद्धतीने मांडल्या.
युपिटर हाऊसने गोवर्धन पूजा व कालिय मर्दन प्रसंगाचे प्रभावी दर्शन घडवले.
मार्स् हाऊसच्या विद्यार्थ्यांनी गोकुळ रासलीला याचे मनोहारी सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर
सॅटर्न हाऊसच्य विद्यार्थ्यांनी महाभारत प्रसंगातून गीता संदेश देत जीवन जगण्याच्या तत्त्वज्ञानाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

हा संपूर्ण कार्यक्रम चारही हाउस प्रमुख व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमानंतर प्राचार्य श्री श्रीधर सुनकरी सर आणि उपप्राचार्या श्रीमती रजनी गोजोरेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक व उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले.

या कार्यक्रमामुळे शाळेत श्रीकृष्ण भक्तीमय वातावरण निर्माण होऊन उपस्थितांना भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांचे आणि जीवनमूल्यांचे ज्ञान मिळाले.
सिद्धेश्वर पाटील सर यांनी सूत्रसंचालन केले;तर गोकुळ पाटील सर यांनी आभार व्यक्त केले.











