Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना काळात जीवाचे रान करणाऱ्या पोलीस बांधवाना “कृती फाऊंडेशन” च्या वतीने मदतीचा हात; १०० लिटर सॅनिटायझर केले वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना काळात जीवाचे रान करणाऱ्या पोलीस बांधवाना “कृती फाऊंडेशन” च्या वतीने मदतीचा हात; १०० लिटर सॅनिटायझर केले वाटप

जळगांव(प्रतिनीधी)- शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. कोरोना या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र मास्क व सॅनिटायझरची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पोलिसांजवळ सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. असुरक्षितरित्या ते आपले कर्तव्य बजावत होते. ही बाब कृती फाऊंडेशन ठाणे टिमच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ दखल घेऊन मुंबई पोलीस उपआयुक्त पोलीस बिनतारी संदेश विभाग मुंबईचे DCPW श्री. यादव यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व ACPW भायखळा किशोर उतळे यांच्या संकल्पनेतुन सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर वाटप केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या संचारबंदी सुरू आहे. पोलिस दिवस-रात्र काम करत आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. त्यांचा रोज हजारो लोकांशी संपर्क येत आहे. त्यांची स्व-सुरक्षा व्हावी यासाठी कृतज्ञता म्हणून १०० लिटर सॅनिटायझर फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष तथा ब्रिटिश स्टॅण्डर्ड इंन्स्टिट्यूटचे मँनेजर व CSR लिड असेसर कपील महाजन व जळगांव पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांच्या पुढाकाराने पोलीस सह उपआयुक्त किशोर ऊतळे पोलीस बिनतारी संदेश विभागाला सुपूर्द केले व ते सँनिटायझर मुंबईतील पोलीस बिनतारी संदेश विभाग नियंत्रण कक्षाला वितरीत करण्यात आले. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्याने स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. असे यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. प्रसंगी, पो.नि. शिरसुध्दे, पो.नि.एस.एच. पाटील, पो.नि. योगेश बोरुडे, पो.उ.नि. दिनकर गावित हे उपस्थित होते. तर सदर उपक्रमासाठी वैशाली महाजन, विजय मोहिते, किमया महाजन यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संशयित रुग्ण शोध मोहिमेमुळे बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता;नागरीकांनी घाबरुन न जाता तपासणीस येणाऱ्या यंत्रणेस सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

इंग्रजी शाळांना बदनाम करु नका, अवास्तव फी घेणाऱ्यांची नावे जाहीर करा; महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo