Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंग्रजी शाळांना बदनाम करु नका, अवास्तव फी घेणाऱ्यांची नावे जाहीर करा; महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/06/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
इंग्रजी शाळांना बदनाम करु नका, अवास्तव फी घेणाऱ्यांची नावे जाहीर करा; महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची मागणी

जळगांव(प्रतिनिधी)- लॉक डाउन मुळे शाळा अडचणीत आल्या आहेत. शिवाय पालकांना फी मागू नका असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. तर दुसरीकडे इंग्रजी शाळा फी वसुल करत असल्याचे आरोप होत आहेत. त्या अनुषंगाने ज्या शाळा वाढीव फी घेत आहेत, त्यांची नावे शिक्षण विभागाने जाहीर करावी. विनाकारण इंग्रजी शाळांना बदनाम करु नये. अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सरकार दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सरकारी शाळामंध्ये ९४ ते ९८ हजार रुपये खर्च करते. असे असले तरी सरकारी व खाजगी शाळांमध्ये मूलभूत फरक आणि बदल आहेत. सरकारी शाळांचे देखील मूल्यमापन व्हायला हवे. पण त्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी काहीच बोलत नाही. केवळ इंग्रजी शाळांना टार्गेट करत आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शाळांना देखील खर्च येतो. यंदा तर कोरोना महामारीमुळे शाळांना शैक्षणिक वर्षे संपण्यापूर्वीच सुट्या देण्यात आल्या. ३० ते ४० टक्के पालकांकडून फी येणे बाकी आहे. त्यामुळे शाळांच्या गाड्यांचे हप्ते, इमारतीचे भाडे, वीज बिल, शिक्षकांचे पगार हे तीन चार महिन्यांपासून थकलेले आहे या परिस्थितीचा विचार करायला हवा. विनाकारण इंग्रजी शाळांना बदनाम करु नका. त्याची शहानिशा करुन इंग्रजी शाळांवर आरोप करावेत. असे ही मेस्टाचे जिल्हाध्यक्ष इंजि.  नरेश पी.चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष विद्या पाटील, प्रदेश प्रतिनिधी प्रा. कांतीलाल पाटील, पंडितराव शिंदे, शिवाजी शिंदे, डॉ. शांताराम पाटील, व्ही.डी.पाटील, प्रा. यशवंत पवार, संदीप पाटील, राजेंद्र महाजन यांनी म्हटले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना काळात जीवाचे रान करणाऱ्या पोलीस बांधवाना “कृती फाऊंडेशन” च्या वतीने मदतीचा हात; १०० लिटर सॅनिटायझर केले वाटप

Next Post

आज जिल्ह्यातील ९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

आज जिल्ह्यातील ९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo