Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना पॉझिटिव्ह आहात, पण लक्षणे नाहीत, काय करावे? अन् काय करु नये?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांत निर्बंध आदेश जारी

देशात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या खूप वेगाने वाढत आहे. आज देशात ९० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. पण दिलासादायक बाब म्हणजे दररोज आढळत असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अनेक जण लक्षणेविरहित आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत.

त्यामुळे केंद्राने लक्षणेविरहित आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये होम आयसोलेशनचा कालावधी १४ दिवसांचा होता, मात्र आता हा फक्त ७ दिवसांचा ठेवला आहे. जर ७ दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर ताप नसेल तर त्या रुग्णांना पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

लक्षणेविरहित रुग्ण कोण आहेत?

नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, पण त्यांच्यामध्ये ताप आणि खोकल्यासारखी लक्षणे दिसत नाहीत. तसेच त्यांचे ऑक्सिजन लेव्हल ९३ पेक्षा कमी नाही, अशा रुग्णांना लक्षणेविरहित रुग्ण म्हटले जात आहे.

तसेच ज्या रुग्णांमध्ये सर्दी, घशात खवखव आणि तापासारखी लक्षणे आहेत, परंतु ऑक्सिजन लेव्हल ९३ पेक्षा कमी असेल अशा रुग्णांना सौम्य लक्षणे असलेले रुग्ण म्हटले जात आहे. दरम्यान जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये ७ दिवस असाल पण अखेरच्या ३ दिवसात तुम्हाला ताप नसला पाहिजे, नाही तर तुमचा आयसोलेशनचा कालावधीत वाढ होईल.

होम आयसोलेशनमध्ये काय करावे, काय करू नये?

सध्या कोरोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. अशातच घरी लोकं आयसोलेट होत आहेत. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते होम आयसोलेशनमध्ये Do’s And Don’ts लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. इंडियन मेडिकल असोसिशयनचे माजी अध्यक्ष आणि यूपी मेडिकल काउंसिल सदस्य डॉ. पी के गुप्ता म्हणाले की, सध्या लक्षणांमध्ये घशात खवखव, सौम्य सर्दी, सौम्य ताप जास्त करून यला मिळत आहेत. ही लक्षणे गेल्या लक्षणांपेक्षा थोडी वेगळी आहेत. गेल्या लक्षणांमध्ये लोकांना जास्त करून खोकला होत होता. तसेच तीव्र ताप येत होता.

होम आयसोलेशन दरम्यान व्हेंटिलेशन गरजेचे

पुढे डॉ. पीके गुप्ता म्हणाले की, जर तुम्ही होम आयसोलेट आहात, तर तुम्ही तुमची खोली एकदम बंद करू नका. वेगळे राहा, पण खोलीत खेळती हवा पाहिजे. म्हणजे खोलीत व्हेंटिलेशन असले पाहिजे. सकाळ-संध्याकाळ खिडकी उघडी ठेवा. जर थंडी वाजली तर ब्लोअरचा वापर करा. होम आयसोलेशनची सविस्तर गाईडलाईन जारी केली आहे. त्याचे तंतोतंत पालन करा.

कोविड पॉझिटिव्ह अशा रुग्णांना जरी लक्षणे असो किंवा नसो. घरातील इतर सदस्यांपासून एकदम दूर राहिले पाहिजे. विशेष म्हणजे वृद्ध आणि आजारग्रस्त असलेल्या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे.

मास्क लावा

काही लोकांना खोलीत एकटे असल्यावर मास्क लावायची गरज नसल्याचे वाटते. परंतु अशा रुग्णांनी नेहमी ट्रिपल लेअर मास्क लावला पाहिजे आणि प्रत्येक ८ तासाला मास्क बदलला पाहिजे. तसेच जर यापूर्वी मास्क थोडा जरी ओलसर झाला असेल तर दुसरा मास्क वापरा. पुरेसे हायड्रेशन आवश्यक असल्याने रुग्णांनी द्रवपदार्थ घ्यावे. होम आयसोलेशनमध्ये साफ-सफाई खूप महत्त्वाची आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इम्पिरियल इं‌टरनँशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग भडगाव तालुकाध्यक्षपदी श्रद्धा गायकवाड यांची निवड

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग भडगाव तालुकाध्यक्षपदी श्रद्धा गायकवाड यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग भडगाव तालुकाध्यक्षपदी श्रद्धा गायकवाड यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d