Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

क्वारंटाईनचा कोल्हापुरी पॅटर्न : निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
क्वारंटाईनचा कोल्हापुरी पॅटर्न : निगेटिव्ह अहवालानंतर घरीच सोय; घरचे सदस्य राहणार भावकीत

कोल्हापूर, दि. 18  : रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरणात राहावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने हे गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित करत आहेत. निगेटिव्ह अहवालानंतर संबंधितांची त्यांच्या घरीच राहण्याची सोय करायची आणि घरातील सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी राहायचे. शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यापासून याची सुरूवात होणार आहे.

Maha Info Corona Website

रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातून बऱ्याचशा प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोक येत आहेत. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुढील 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. यावर पर्याय शोधून खासदार धैर्यशील माने यांनी नवा पॅटर्न करण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये ते राहण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे घर रिकामे करायचे आणि त्या घरात रहात असणाऱ्या त्यांच्या सदस्यांनी आपल्या भाऊबंदांकडे किंवा शेजाऱ्यांकडे राहायचे. पुढील 14 दिवस संपर्कात यायचे नाही. त्या घरावर फलक लावून त्यावर अलगीकरण कालावधी लिहायचा. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय त्यांच्या घरच्या लोकांनीच करायची.

येणाऱ्या लोकांची सोय करण्यात प्रशासनाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे गावच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या मदतीने या नव्या पॅटर्नची सुरूवात शाहुवाडी-पन्हाळा येथून सुरूवात करत आहोत. घरच्या लोकांनी आपल्या, गावाच्या सुरक्षिततेसाठी घर रिकामे करून बाहेरून येणाऱ्या आपल्याच लोकांना द्यावे आणि काही दिवस दक्षता घ्यावी, असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी या नव्या पॅटर्नच्या निमित्ताने केले आहे. या नव्या पॅटर्नमुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामास मदत होईल. कुटुंबाला, पर्यायाने गावाला धोका होणार नाही. सामाजिक बांधिलकी, एकोपा वृद्धिंगत होण्यास मदत होईल आणि अलगीकरणाच्या तंतोतंत पालनास होणार मदत होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहीद धनाजी होनमाने यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post

कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

Next Post
कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

कोरोनाशी लढण्यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेतर्फे ‘नगरसेतू ॲप’ विकसित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo