Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- प्रकाश वानखेडे-पोलीस निरीक्षक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
खेळामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उच्चप्रतीचे- प्रकाश वानखेडे-पोलीस निरीक्षक

फैैजपू-(रशाकिर मलिक) -सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मोबाईलच्या वेडापायी तरुण पिढी मैदानी खेळाकडे वळत नसून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचत चालली आहे. छोट्या छोट्या अपयशाला पचवणे तरुणांना अवघड जाते. यावर सर्वोत्तम उपाय म्हणून खेळाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शारीरिक मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्टा करून यश साध्य करण्याची उमेद जागृत करण्याची सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे असे मत फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अंतर्गत जळगाव विभागीय आंतरमहाविद्यालयीन भारतोलन व शक्तीतोलन ( पुरुष महिला ) व शरीरसौष्ठव ( पुरुष) स्पर्धा 2019 20 च्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री प्रकाश वानखेडे पोलीस निरीक्षक फैजपुर यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ जी एस मारतळे यांनी केले. त्यांनी खेळाच्या माध्यमातून तरुणांमध्ये भविष्यातील करिअरच्या विविध संधी ची उपलब्धता आणि खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास यावर विवेचन केले.या स्पर्धेसाठी जळगाव क्रीडा विभागाचे सचिव माननीय श्री पी आर चौधरी (पी आर नाना) भोळे महाविद्यालय, भुसावळ येथील प्रा संजय चौधरी, संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर, येथील प्रा वीरेंद्र जाधव, भालोद महाविद्यालयाचे प्रा मुकेश पवार, रावेर येथील प्रा. उमेश पाटील, प्रा जाधव सर प्रा पंकज पाटील, मूळजी जेठा महाविद्यालय जळगांव येथील प्राध्यापक अंकुश चौधरी गव्हर्नर्मेंट इंजिनीअरिंग जळगाव येथील प्राध्यापक सानप सर आदी मान्यवर, निवड समिती सदस्य , तांत्रिक समिती सदस्य, संघ मार्गदर्शक आणि पंच उपस्थित होते.

या स्पर्धांना राष्ट्रीय पंच योगेश महाजन यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी तुषार सपकाळे, प्रशिक्षक, प्रशांत कोळी, अभिषेक महाजन या उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
उद्घाटन पर मार्गदर्शन करताना माननीय श्री प्रकाश वानखेडे यांनी खेळांचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने आयोजकांचे आभार मानले आणि अभिनंदन केले या सोबत खेळांच्या माध्यमातून पोलीस विभागात विविध सेवांमध्ये प्राधान्य असल्याने तरुणांना खेळाच्या माध्यमातून पोलिस दलात कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. याकामी फैजपूर पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी सदैव मार्गदर्शन आणि सहकार्य देतील असे आश्वासन दिले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांनी सर्व खेळाडूंचे संघ मार्गदर्शक यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले आणि खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्टा करून यश साध्य करावे. अथक प्रयत्नातून यश निश्चितच मिळते याचा उत्कृष्ट उदाहरण धनाजी नाना महाविद्यालय असून विद्यापीठ परिक्षेत्रात अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा डॉ जी एस मारताळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी श्री नितीन सपकाळे श्री राजेंद्र ठाकूर श्री युवराज गाढे, श्री तुषार सपकाळे, प्रशांत कोळी, प्रेरणा सोनवणे, आरती सुरवाडे, भूषण तायडे, शुभम मोरे, तुषार मोरे यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगावात रॅली

Next Post

शिवसेने चा भडगांव येथे महायुती व्यापारी मेळावा संपन्न

Next Post
शिवसेने चा भडगांव येथे महायुती व्यापारी मेळावा संपन्न

शिवसेने चा भडगांव येथे महायुती व्यापारी मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo