Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जकात फंडचा निधी हेल्प-फेअर ३ मधील संस्थांना दान करणार गुजरात पेंट्सचा स्तुत्य निर्णय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
यंदाचे हेल्प-फेअर ठरणार जास्त प्रेरक आणि परिणामकारक  जिल्ह्यासह बाहेरील संस्थांची असणार हजेरी

जळगाव – असं म्हणतात की गरजूंना दान करण्यासाठी कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या भिंती आडव्या येत नाहीत. या सर्व भिंतींच्या पलीकडे जाऊन गरजूंना आपल्या मिळकतीतील काही रक्कम दान करण्यासंदर्भाची शिकवण प्रत्येक धर्मात शिकविली आहे. पवित्र कुराण मध्ये देखील हीच शिकवण दिलेली आहे. आणि मोहम्मद पैगंबरांच्या या शिकवणीलाच अनुसरून कुठलेही बंधन न पाळता केवळ मानवता धर्म पाळून केवळ मानवतेसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांपैकी काहींना गुजरात पेन्ट्सतर्फे जकात फंडचा काही निधी दान करणार असल्याचा संकल्प गुजरात पेन्टसचे श्री. जावेद मेमन यांनी केला आहे.

”गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सागर पार्क येथे हेल्प-फेअरला भेट देत आहोत. येथे विविध क्षेत्रातील गरजूंसाठी काम करणाऱ्या संस्थांची माहिती आम्हाला एकाच छताखाली मिळाली. थोड्या-थोड्या गोष्टींबद्दल तक्रारी करणारे अनेक लोक आपल्या अवती-भवती आहेत. अश्या परिस्थितीत बऱ्याच साधनांची पुरेशी सोय नसतांना आणि अनेक गोष्टींचा अभाव असतांना देखील केवळ मनात सेवाभाव आहे आणि गरजूंसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे म्हणून तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या या संस्थांना आपल्या परीने जकात फंडातील काही अमानत दान करण्याचा विचार आला आणि त्यानुसार यावर्षी ही अमानत आम्ही दान करणार आहोत. मुस्लिम समुदायात काही कर्तव्ये सांगितलेली आहेत. त्या पैकीच एक म्हणजे रमजान मध्ये जकात म्हणजेच दान करण्याविषयीची शिकवण आहे. प्रेषीत मोहम्मद पैगंबरांची ही शिकवण आहे की गरजूंना मदत करा. मदत करतांना जाती-धर्माच्या भिंती बांधू नका. आणि म्हणूनच आम्ही हेल्प-फेअर मधील संस्थांना दान करणार आहोत. – ( जावेद मेमन )

१५ ते १७ फेब्रुवारी २०२० असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हजारो व्यक्ती भेट देणार असून  आपले सेवा कार्य पोहचविण्याची ही संधी आहे. त्याद्वारे मदत मिळविण्यास चालना मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी मानवतेच्या या मंदिरांना म्हणजेच  हेल्प-फेअरला सागर पार्क, जळगाव येथे सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत भेट द्यावी व  यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मल्हार हेल्प-फेअर टीमकडून करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इकरा संस्थेत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली

Next Post

सार्वजनिक शिवजयंती निमित्त मेहरुण परिसराची विविध मंडळाची महत्वपुर्ण बैठक संपन्न

Next Post
सार्वजनिक शिवजयंती निमित्त मेहरुण परिसराची विविध मंडळाची महत्वपुर्ण बैठक संपन्न

सार्वजनिक शिवजयंती निमित्त मेहरुण परिसराची विविध मंडळाची महत्वपुर्ण बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d