Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान!

जळगांव (प्रतिनिधी) – जळगांव ग्रामिण मतदार संघातून लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील हे निवडणूक लढविणार असल्याचे जवळ जवळ निश्‍चित झाले असल्याने सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

आजपासून उमेदवारी नामांकन अर्ज विक्री सुरु झाली असून पहिल्याच दिवशी लकी अण्णा टेलर यांनी नामांकन अर्ज घेतला आहे. तर जळगांव ग्रामिण मतदार संघातील गोवोगावी जावून थेट मतदार संघातील मतदारांशी संपर्क साधत आहे. ठिकठिकाणी मेळावे घेवून मतदार संघ पिंजून काढत आहे. जळगांव ग्रामिण मतदार संघातील भाजपाची ताकद लकी अण्णा टेलर यांच्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहे.
जळगांव ग्रामिण मतदार संघातून निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढविणार याबाबत लकी अण्णा टेलर यांना आमच्या “सत्यमेव जयते” च्या प्रतिनिधी ने विचारणा केली असता ते म्हणाले सेना-भाजपाची युती न झाल्यास भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढेल, युती झाल्यास मी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले असून जळगांव ग्रामिण मतदार संघातील ‘भाजपा’ पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे लकी अण्णासाठी ‘ताकद’ लावत आहे. लकी अण्णा हे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती असतांना कृउबाला नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाचा कारभार चालवतांना घेतलेले निर्णयामुळे ‘व्हीजन’ आणि पारदर्शक कारभाराची शैली जळगांव ग्रामिण मतदार संघातील अनेकांनी पाहीली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून लकी अण्णा टेलर यांनी जळगांव ग्रामिण मतदार संघात संपर्क वाढविला. गावोगावी जावून संधी दिल्यास भुलथापा मारणार्‍यां नेत्यांपासून सुटका करुन मतदार संघात एकही कच्चा रस्ता ठेवणार नसल्याचे आश्‍वासन देतांना दिसत आहे.

ना.गुलाबराव पाटील यांची देखील जळगांव ग्रामिण मतदार संघावर चांगली पकड आहेच मात्र युती असतांना भाजप या मतदार संघात युतीच्या उमेदवाराला मदत न करता लकी अण्णा यांना करत असेल तर ना.गुलाबराव पाटील यांच्या यांना लकी अण्णा टेलर नावाचे तगड्या आव्हानाला समोर जावे लागेल हे निश्‍चित.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चौऱ्यात्तर पावसाळ्याचा जमाखर्च’ अभिवाचनाने परिवर्तन अभिवाचन महोत्सवातील प्रेक्षकांची मने जिंकली

Next Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शहरात ५०० कापडी पिशव्या वाटप

Next Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे शहरात ५०० कापडी पिशव्या वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo