Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चौऱ्यात्तर पावसाळ्याचा जमाखर्च’ अभिवाचनाने परिवर्तन अभिवाचन महोत्सवातील प्रेक्षकांची मने जिंकली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
चौऱ्यात्तर पावसाळ्याचा जमाखर्च’ अभिवाचनाने परिवर्तन अभिवाचन महोत्सवातील प्रेक्षकांची मने जिंकली

जळगाव(प्रतिनीधी)- संजीवनी फाउंडेशन अंतर्गतआयोजित परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या सातव्या  दिवशी प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या “चौऱ्यात्तर पावसाळ्याचा जमाखर्च” या कथेचं अभिवाचन मुंबई येथील गिरीश पतके यांनी सादर केले. एका लेखकाने लेखकाच्या जीवनाविषयी लेखन करून मानवी जीवनाचे विविध पदर उलगडणारे हे अभिवाचन होते.वृद्ध माणसांच्या जगण्यात येणारी असहायता आणि मरणाची वाट पाहत असताना आयुष्याच्या उतारवयात आठवणी दाटून येतात, या आठवणीची ही कथा होती.  पत्नीच्या निधनानंतर एकाकी माणसाच्या जीवनातील घटना, हिंसा, प्रेम अशा अनेक घटना गिरीश पतके यांनी सुंदर  उभे केलेत. शहरीकरण, पोलिसदल, मुंबईतल्या गर्दीने निर्माण झालेले प्रश्न व यासाठी मी काहीच करू शकलो नाही अशी एकाकी व सामान्य माणसाची हतबलता व्यक्त करणारी ही इच्छामरण मागताना  होणारी घुसमट मांडली. अतिशय  मार्मिक , अंतर्मुख करणारे सामान्य जीवन अभिवाचन महोत्सवात सादर करण्यात आले. साहित्य अभिवाचन महोत्सवाला इंजिनियर असोसिएशन, आर्यन पार्क व आमदार राजू मामा भोळे यांचे सहकार्य लाभले आहे. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या अभिवाचनाची प्रकाश योजना  रवी मिश्रा, पार्श्व संगीत प्रफुल्ल गायकवाड यांचे होते. याप्रसंगी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी डी एस बॊबडे, केशव स्मृतीचे रत्नाकर पाटील, डॉ. श्रध्दा महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केलं. उद्या शनिवारी महोत्सवाचा समारोप सायं ६.३० वा. “अमृता, साहिर आणि इमरोज”

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पितृ स्मरणार्थ सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक,बांधिलकी चा निर्माण केला वसा किशोर पाटील कुंझरकर यांचा पितृ स्मरणार्थ कृतीयुक्त आदर्श

Next Post

जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान!

Next Post
जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान!

जळगांव ग्रामिणमधून ना.गुलाबराव पाटलांसमोर लकी अण्णा टेलर यांचे तगडे आव्हान!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo