Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मतदार संघातून नवे पर्व, युवा सर्व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे “कल्पिता पाटील” प्रबळ “दावेदार”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/09/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
जळगाव ग्रामीण मतदार संघातून नवे पर्व, युवा सर्व या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे “कल्पिता पाटील” प्रबळ “दावेदार”

जळगांव(प्रतिनीधी)- लोकशाहीचा महाराष्ट्रातील महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने विविध राजकीय पक्ष व राजकारण धुरंधरांची उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी व जय्यत तयारी सुरु आहे,परंतु जळगांव ग्रामीण मतदार संघातून केवळ निवडणूक हा विषय डोळ्यासमोर न ठेवता विविध सामाजिक समस्या व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषयांवर  निरंतर ,नियोजनबद्ध व निर्णायक काम सदोदित चालू ठेवणा-या महाराष्ट्रातील प्रथम युवा सरपंच व राष्ट्रवादीच्या युवती प्रमुख यांनी विरोधकांच्या गोटात चांगलीच धडकी भरवली आहे.कारण सामान्य जनतेशी व विशेषतः महिलांशी पाटील यांचा असलेला दांडगा संपर्क व  नवे पर्व युवा सर्व या राष्ट्रवादीच्या चाणक्य नितीमुळे कल्पिता पाटील विधानसभेच्या उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार ठरत आहेत.

प्रथम महिला युवा सरपंच व पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी व राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांनी दाखविलेल्या विश्वास सार्थ ठरवत पाटील यांनी मतदार संघात सातत्यपूर्ण जनसंपर्क ठेवत लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.युवा महिला चेहरा,उच्च शिक्षित,नम्रता,कर्तव्य दक्षता व सामान्यांची जाण व पवार कुटुंबीयांशी असलेली जवळीक  या जोरावर त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सातत्यपूर्ण कार्य साकारत त्यांनी स्त्री सबलीकरण, स्री अन्याया विरुद्ध वाचा  फोडणे, युवा मार्गदर्शन, युवती संवाद, महिलांना मोफत सॅनिटरी पॅड वाटप व जागृती करणे, वृक्ष रोपण मोहीमेस चालना देणे, शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण व न्याय मिळवून देणेसाठी वेळोवेळी आंदोलन करणे, महिलांचा सामाजीक  सहभाग वाढवणे,  शिक्षण, आरोग्य, रस्ते, या विषयी लोकांच्या समस्या जाणून घेऊन व सोडवण्यासाठी प्रयत्न करणे  अशा व अजूनही लोकहिताच्या विविधांगांना स्पर्श करणारे विधायक कार्य कल्पिता पाटील करीत आहेत. त्यामुळेच कमी कालावधीत उच्च शिक्षणाचा चांगला वापर ग्रामीण विकासाठी करीत त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहे. त्यामुळे असे नेतृत्व जनता सहज स्वीकारु शकते असा जाणकारांचा कयास आहे व जनेचे आशीर्वाद लाभल्यास प्रथमच युवा महिला आमदार म्हणून इतिहास घडणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यामंदिरात ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा

Next Post

निधनवार्ता-गं.भा. पुष्पा अमृत शिंदे

Next Post
निधनवार्ता-गं.भा. पुष्पा अमृत शिंदे

निधनवार्ता-गं.भा. पुष्पा अमृत शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo