Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिंतूरचे आमदार विजय भांबळेंवर गुन्हा दाखल जिंतूर नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्याला घरी बोलवून केली मारहाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
जिंतूरचे आमदार विजय भांबळेंवर गुन्हा दाखल जिंतूर नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्याला घरी बोलवून केली मारहाण

प्रतिनिधी परभणी : जिंतूर नगर परिषदेच्या एका अधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांनी घरी बोलवून मारहाण केली. ही घटना ५ जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकणी जिंतूर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत आमदार भांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अधिकाऱ्यावर ही अॅट्रासिटीचा चा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे.

जिंतूर पालिकेतील कर वसुली अधिकारी दत्तराव विश्वनाथ तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीत आमदार भांबळे यांनी त्यांना घरी बोलावून घेतले होते. त्यांनी सांगितलेले काम तू का केले नाही, ते करण्यासाठी दबाव आणला. परंतु, या दबावाला नकार दिल्यानंतर आमदार भांबळे यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर याच वेळी दत्ता तळेकर यांच्या विरोधात देखील एकाने फिर्याद देऊन अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, आमदार भांबळे यांनी या पूर्वीही अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समाचार घेतला आहे. या घटनेचे जिंतूर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. आजच्या या घटनेने पूर्ण जिल्ह्यत खळबळ उडाली असून, पोलिस ठाण्यात तळेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण घडल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणत लक्ष घातले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावर मोठा दबाव आल्याची चर्चा जोर धरून आहे. जिंतूर येथे नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांची हे प्रकरण हताळताना चांगलीच तारांबळ उडणार.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कौटुंबिक हिंसाचार व प्रतिबंधक कायदा – २००५

Next Post

नाशकात मुसळधार अतिवृष्टीमुळे अतिदक्षतेचा इशारा

Next Post
नाशिक जलमय “जनजीवन विस्कळीत”

नाशकात मुसळधार अतिवृष्टीमुळे अतिदक्षतेचा इशारा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo