Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

जळगाव-(जिमाका)-जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी महिला तक्रारदारांक्रडून  एकूण 05 तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 04 अर्ज सहकार विभाग तर 01 अर्ज माध्यमिक शिक्षण विभागाकडील होते. प्राप्त  सर्व अर्ज संबंधित विभागांकडून पाठवून देवून ते अर्ज निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सहकार व शिक्षण विभागास दिल्यात .

              जिल्हास्तरीय महिला  लोकशाही दिनास  उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, जिल्हा परिषदेचक उपमुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) श्री. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था), विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रशासक व प्रतिनिधी, तक्रारदार महिला उपस्थित होत्या.

            जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर  जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी  माहे जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रारीं अर्जांचा आढावा घेतला. तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे  यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

            त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात महिला तक्रारदारांनी लोकशाही दिनाशी  संबंधितच तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत, लोकशाही दिनास बाहेर गावाहुन महिला तक्रारदार विशेष करून वयोवृध्द महिला असतात. त्यामुळे त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण/निराकरण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित रहावे. जे विभागप्रमुख विनापरवानगी गैरहजर राहतील. त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आजच्या बैठकीत सर्व संबंधितांना दिला. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

के. सी. ई. च्या पी. जी. कॉलेज तर्फे गेस्ट लेक्चर सिरीज

Next Post

जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Next Post

जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo