Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टॅक्सी व रिक्षा यांच्या टपांवर रुफलाईट बसविणे अनिवार्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव- महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 140 मधील सुधारणांद्वारा विहीत केल्यानुसार टॅक्सी व रिक्षा यांच्या टपांवर रुफलाईट बसविणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार नविन नोंदणी होणाऱ्या मीटर्ड टॅक्सींच्या टपावर रुफलाईट बसविल्याची खात्री करूनच वाहनांची नोंदणी करण्यात येणार आहे.

काळ्या व पिवळ्या रंगातील टॅक्सी व ऑटोरिक्षांवरील रुफलाईट फिकट पिवळ्या रंगाचा आणि कुकॅबवरील रुफलाईट चंदेरी किंवा निळ्या रंगाचा असावा. टॅक्सीवरील अक्षरे पुढच्या बाजूने किंवा पुढील व मागील अशा दोन्ही बाजूंनी प्रदर्शित केलेली असली पाहिजे शिवाय ऑटोरिक्षावरील चिन्ह हे उप-नियम (6) मध्ये विहीत केलेल्या पध्दतीने पुढील पुढील बाजूने प्रदर्शित करण्यात आले पाहिजे.

परिवहन आयुक्त हे रुफलाईट बाबतचे  विनिर्देशित करुन संकल्पनेस मान्यता देतील. मोटार कॅब सुरू असताना अथवा चालविण्यासाठी रस्त्यावर उभी असताना रुफलाईट सदैव योग्य प्रकारे प्रकाशित करण्यात आला पाहिजे  नविन टॅक्सीवर रुफलाईट त्वरीत प्रभावाने बसविणे सक्तीचे असेल तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या टॅक्सीवर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणावेळी अथवा निश्चित दिनांकापासून रुफलाईट बसविणे सक्तीचे करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निर्णय घेईल आणि परिवहन आयुक्त विनिर्दिष्ट करतील त्या तारखेपासून ऑटोरिक्षांना रुफलाईट बसविणे बंधनकार असेल.

रुफलाईट बसविण्यासाठी परिवहन आयक्त, मुंबई यांनी 1) मे.टॉप्स ऑन मुव्ह, मुंबई 2) में. इन्स्पायर इंजिनियरींग प्रा.लि.मुंबई 3) मे. रिलिक्स इंडस्ट्रिज प्रा.लि.4) मे. लकी ई मोअर्स एलएलसी, मुंबई या उत्पादकांची नविन नोंदणी होणाऱ्या मीटर्ड टॅक्सींना सदर रुफलाईट बसविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Next Post

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शन शिबीर संपन्न

Next Post

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शन शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo