Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तरुण वर्गात मूळव्याध आणि वंध्यत्व होण्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/11/2019
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
तरुण वर्गात मूळव्याध  आणि वंध्यत्व होण्याचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय

जळगांव (धर्मेश पालवे):- आज सर्वत्र जीन्स ही जगातल्या काना कोपऱ्यात पसरलेल्या जाळ्या सारखी वापरली जात आहे. मुख्य म्हणजे भारत भर प्रमुख महानगरात व त्यातील लहान मोठ्या गावामध्ये ही जीन्स वापरली जाते विशेष म्हणजे महिला, पुरुष,बाल व तरुण तरुणीची जीन्स घालताना दिसत असल्याचं आपण पाहत आहोत. हव्या हव्याश्या या कापडाच्या जीन्स आता डोकेदुखी बनत आल्याच समोर येत आहे.जीन्सचे कापड हे खूप जाड असते त्यामुळे हवा सुध्दा सहजपणे जाऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता कपड्यांच्या आतच कोंडून ठेवली जाते. थंड वातावरणात लराहणाऱ्या व्यक्तींनी जीन्स वापरली तर ठीक आहे पण भारतासारख्या उष्णकटिबंधातील लोकांनी सतत जीन्स वापरणे पूर्णपणे चूक आहे. कंबर, जननेंद्रिय आणि जांघेच्या भागात एरवीही अधिक प्रमाणात घाम येतो.नेहमी जीन्स वापरल्याने हा घाम त्या ठिकाणी साचून राहतो आणि ‘फंगल इन्फेक्शन’ होते. जर एकच जीन्स न धुता चार चार दिवस वापरली तर जीन्सवरची घाण आणि आतला साचणारा घाम याच्यामुळे अशा व्यक्तींना होणारे ‘फंगल इन्फेक्शन’ कितीही अँटी फंगल क्रीम्स वापरली तरी बरे होत नाही. गेल्या पाचेक वर्षात असे जुनाट फंगल इन्फेक्शनचे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जीन्सचा अतिरेकी वापर हे याचे महत्त्वाचे कारण आहे.हल्लीच्या बहुतांश लोकांच्या कामाचे स्वरूप बैठे आहे. जीन्स घालून सतत खुर्चीवर बसल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. ही उष्णता काही जणांमध्ये पाईल्स, फिशर यासारखे गुदद्वाराशी संबंधित आजार निर्माण करते. पाईल्स म्हणजे गुदव्दाराशी निर्माण होणारे अंकुर तर संडासाच्या जागी निर्माण होणारी जखमेला फिशर असे म्हणतात. ही जखम अत्यंत वेदनादायक असते. कधी कधी बद्धकोष्ठतेचा विशेष त्रास नसणाऱ्या व्यक्तींमध्येही फिशर बघायला मिळते अशा वेळी त्याचे कारण जीन्स घालून सतत एका जागी बसणे हे असते.नेहमी टाईट जीन्स घालणाऱ्या आणि हाय हील संडल्स तरुणींची व्यथा काय सांगावी ? उभे राहणे आणि चालणे या क्रिया विचित्र पद्धतीने कराव्या लागल्यामुळे त्यांना कंबरदुखी, टाचदुखी आणि फ़ंगल इन्फेक्षण मुळे गर्भपिशवी चे आजारही बडावतात, तर गर्भवती महिला असल्यास गर्भपातही होऊ शकतो, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे यांना तोंड द्यावे लागते. टाईट जीन्समुळे कंबर आणि मांड्यांच्या नसांना (Nerves) ईजा होऊन मांड्या आणि पायांना मुंग्या येणे, आग होणे यासारखे प्रकार उद्भवू शकतात. सतत जीन्स वापरल्यामुळे होणारे हे आजार पाहून जीन्सचा अतिरेक किती घातक आहे हे लक्षात येतं.
जसा देश तसा वेष अशी म्हण आहे. पण आज आपला पेहराव फॅशनवर ठरतो. कधीतरी बदल म्हणून करण्याची ‘फॅशन’ हीच सगळ्या ‘नेशन’ची आवड झाली तर आरोग्याची परिस्थिती कशी ‘भीषण’ होते याचे उदाहरण म्हणजे जीन्स सदर शोध लिखाण हे एका प्रख्यात डॉक्टरांच्या लिखित संदर्भातून सारांश घेऊन लिहिले आहे
.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बालकांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कुटुंब संस्था जपणे आवश्यक-डॉ.उमेश वाणी

Next Post

तांदुळवाडी गावाच्या महिला बचत गटाचा अण्णा हजारे यांच्या गावी भेट दौरा

Next Post
तांदुळवाडी गावाच्या महिला बचत गटाचा अण्णा हजारे यांच्या गावी भेट दौरा

तांदुळवाडी गावाच्या महिला बचत गटाचा अण्णा हजारे यांच्या गावी भेट दौरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d