Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

.…तर गाळे जप्तीची कारवाई होणार : पालकमंत्र्यांचा इशारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जिल्हा क्रीडा संकुलासह तालुका क्रीडा संकुलांसाठी निधीची तरतूद

जळगाव, दिनांक ३ (प्रतिनिधी ) : जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळेधारकांनी आजच्या बाजार भावानुसार भाडे व अनामत रकमेचा भरणार करावा असे सूचित करत याआधी अनधिकृतपणे गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण केलेल्या गाळेधारकांवर गाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला. ते जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या सभेत बोलत होते. या सभेत क्रीडा संकुलांशी संबंधीत सर्व विषयांवर व्यापक उहापोह करण्यात आला.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची सभा आज जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सा. बां. खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांचे प्रतिनिधी पी.जी. टोळई, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

या सभेत जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या व्यापारी गाळेधारकांचा प्रलंबीत प्रश्नावर चर्चा करण्यात करण्यात आली. या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जुन्या व्यापारी गाळयांची जागा ही मोक्याची जागा आहे. आज त्याचे बाजार भावानुसार दर निश्चित केल्यास क्रीडा संकुल समितीस मोठया प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होईल. त्यामुळे जे अधिकृत गाळेधारक असतील त्यांचा बाबत त्यांनी क्रीडा संकुल समितीचे यापूर्वी कळविण्यात आलेले भाडे व अनामत रक्कम भरणा केल्यानंतर विचार करण्यात येईल असे ते म्हणाले.

दरम्यान, जे अनाधिकृत गाळयांचे परस्पर हस्तांतरण करून घेतलेले गाळेधारकांवर गाळे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात यावी. त्याच प्रमाणे क्रीडा संकुलातील थकीत गाळा भाडे गाळेधारकांकडून वसुली करण्यात यावी गाळयांचे भारणा करीत नसतील तर गाळे जप्तीची कारवाई करण्यात यावी असे निर्देश ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. तसेच क्रीडा संकुलातील सुविधा नुतनी करण, गाळयांकडील पेव्हींग ब्लॉक बसविणे व टायलेट दुरूस्तीचे कामे, दर्शनी भाग सुशोभिकरण करणे, क्रीडा संकुलाचे रंगकाम करणे, या बाबी त्वरीत करून घेण्यात यावेत अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. यासोबत  जिल्हा क्रीडा संकुल करीता शासनाकडून उर्वरित अनुदान प्राप्त तसेच तालुका संकुल जळगांव करिता निधी ही उपलब्ध होणार असल्याने त्या करीता शहरामध्ये अथवा लगत परिसरात जागा उपलब्धतेबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी कार्यवाही करावी असे सुचित केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातील तहसील कार्यालयात अभिवादन

Next Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Next Post
इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d