Monday, July 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि. 6 (जिमका) : तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रतिवर्ष १३,५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

या योजनेचा लाभ प्री-मॅट्रिक म्हणजे इयत्ता ९ वी व १० वी तसेच पोस्ट-मॅट्रिक म्हणजे इयत्ता ११ वी, १२ वी, महाविद्यालयीन शिक्षण आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन करणाऱ्या पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठात नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असून, अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले अधिकृत ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी जागांची संख्या मर्यादित असल्याने लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील मेरिटच्या आधारे करण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने अर्जदाराचे बँक खाते आधार-लिंक असणे आवश्यक आहे.

पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

Next Post
संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo