जळगाव- (जिमका)- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या PM-YASASVI केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मॅट्रिकपुर्व व मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित शाळा व महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असून, इयत्ता 9 वी व 10 वीतील मॅट्रिकपुर्व व मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

पात्र विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल https://scholarships.gov.in (NSP) वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारिख 31 ऑक्टोबर 2026 आहे. तसेच संबंधित शाळा व महाविद्यालयांनी इन्स्टिट्यूट लेव्हल व्हेरिफिकेशन प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विशाल पं. पाटील, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी केले आहे.








