Saturday, July 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नको नको म्हणता गांधीच हवा ‘गांधी नाकारायचाय’चे अभिवाचन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नको नको म्हणता गांधीच हवा ‘गांधी नाकारायचाय’चे अभिवाचन

जळगांव(प्रतिनिधी)- परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या पाचव्या पर्वातील दुसऱ्या पुष्पात शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित ‘गांधी नाकारायचाय’ या नाटकाचे अभिवाचन आयोजित करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दैनिक लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, महावीर क्लासेसचे नंदलाल गादीया व नगरसेवक-रंगकर्मी अनंत जोशी उपस्थित होते. अभिवाचनाच्या माध्यमातून सहज गमतीत सुरू झालेली चर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समाज न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. त्यांच्यावर खटला चालवला जातो. त्यांच्यावर विविध आरोप करण्यात येतात त्यांच्या गांधींच्या माध्यमातून आपलं इतिहासाचं आकलन, एकूणच आपले समज, समाजमाध्यमातून पसरलेले गैरसमज आणि आपल्या वैचारिक गोंधळामुळे एकूणच गोंधळाची झालेली निर्मिती हलक्या फुलक्या चिमट्या घेत, शेरे बाजी करत वाचन करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांना हसवले, अंतर्मुख केलेत. ज्यावर लाखभर पुस्तकं लिहिली गेलीत तो गांधी न वाचता आपण ऐकीव माहितीवर आपण आपल्या मनात गांधींची चुकीची प्रतिमा उभी करत राहतो, इथपर्यंत प्रेक्षक येऊन पोहचतो.विजय जैन यांचा गांधी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलीत  मंजुषा भिडेंची महिला प्रतिनिधी, मंगेश कुलकर्णीचा कर्मठ म्हातारा, नारायण बाविस्कर, होरीलसिंग राजपूत  यांनी सामान्य माणूस तंतोतंत प्रेक्षकांच्या मनात उभे केले.सदर नाट्याची मूळ संकल्पना व नाट्य रूपांतरण शम्भू पाटील, दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक योगेश पाटील, नेपथ्य राहुल निंबाळकर, प्रकाश योजना मंगेश कुलकर्णी यांनी केले.गोळ्या झाडून पुतळे तोडुनही जो संपायला तयार नाही तो गांधी ऐकायला प्रेक्षकांनी या महोत्सवाला जबरदस्त प्रतिसाद दिला, खुर्च्यां अभावी अनेक प्रेक्षक दाटीवाटीने उभे राहिले व बरेच लोक परतही गेले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप केदार यांनी केले, निर्मिती वसंत गायकवाड आणि नेपथ्य-संगीत राहुल निंबाळकर व श्रद्धा कुलकर्णी तर प्रकाश योजना अक्षय नेहे यांनी केली. उद्या भारत सासणे अनुवादित अब्दुल बिस्मिल्लाह ह्यांच्या दंतकथेचे अभिवाचन करण्यात आलेले आहे, तरी उपस्थितीचे आव्हान परिवर्तनतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रा.प्रकाश महाजन यांच्या “त्रिवेणी संगम” काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Next Post

आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धां उत्साहात संपन्न

Next Post

आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धां उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo