Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला ; विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला ; विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

जळगाव – ( जिमाका )- जिल्हा प्रशासन नुकतेच विधानसभा निवडणुकीच्या कामातून मुक्त झाले. आज जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतला. त्यात ‘दिशा ‘ (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ) समितीच्या विषयाशी निगडित बाबी अंतर्भूत होत्या.
याप्रसंगी सर्व विकास कामांचा संबधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी ज्या यंत्रणाकडे कामे प्रलंबित आहेत, त्यांना फोनवर घेवून समोरासमोर अडचणी सोडवून दिल्या.
रेल्वेचे विविध ठिकाणचे प्रलंबित पूल, त्याला निगडित सार्वजनिक बांधकाम, भूसंपादन, क्रिडा, परिवहन, नगर विकास, वन, मुद्रांक शुल्क, नगर रचना ,GSDA, ग्रामीण विकास, जलसंपादन, शिक्षण विभाग, क्रिडा, जिल्हा उद्योक केंद्र, सहकार, कौशल्य विकास, नगरविकास, तहसिलदार संबधित प्रकरणे, पुर्नवसन, MIDC इत्यादी सर्व विभागातील प्रलंबित विकास कामांची व योजनांचा पाठपुरावा करण्यात आला.
विशेषतः रेल्वेसाठी करावयाचे जमिनीचे संपादन, महामार्ग आणि जलसंपदासाठी प्रलंबित भूसंपादन या विषयावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राष्ट्रीय महामार्गाचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून हे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी आपण स्वतः जिथे अडथळा असेल तिथे हजर असल्याचे सांगून कामं सुरु आहेत पण त्याचा वेग अजून वाढविण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिला.
या सोबतच जलसंपदा आणि इतर विभागातील सर्व प्रलंबित कामे योग्य समन्वय साधत त्वरित पुर्ण कराव्यात अशा सुचना या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजू लोखंडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, पुनर्वसन विभागाचे दुसरे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

Next Post
बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

बातमी तशी जुनी पण... या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo