Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक  त्यासाठी पशुगणनेचे सूक्ष्म नियोजन करा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव – ( जिमाका) – पाच वर्षातून एकदा होणारी पशु गणना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. या पशु गणनेच्या माध्यमातून विविध भागात असलेले पशुधन त्यांची परिस्थिती करावयाच्या उपायोजना या सर्व बाबींचे आकलन होत असल्याने पशु गणना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पशु गणना प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर नरवाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप झोळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मास्टर ट्रेनर डॉ. अमित कुमार दुबे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पशु गणनेच्या माध्यमातून पासून विषयी अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती मिळते. पशु प्राणी यांची काळजी कशी घ्यावी याची देखील माहिती या निमित्ताने पुढे येते. पशुगणना हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने पशु गणना ही सूक्ष्म नियोजन पद्धतीने करावी. पशु गणना करताना गाव खेड्यावरील एकही पशु सुटणार नाही याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. गाव खेड्यावरील प्रत्येक गोठ्या पर्यंत जाऊन पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशु गणना करणे आवश्यक असल्याचेही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या पशुगणनेच्या माध्यमातून जिल्हाभरातील पशुंविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे. पशुगणनेच्या माध्यमातून विविध जाती प्रजातींच्या पशूंची गणना होणार असून त्यानिमित्ताने जिल्ह्यात असलेल्या पशुधनाची आकडेवारी पुढे येणार आहे.

पशुपक्ष्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा दुग्ध व्यवसाय तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने देखील पशुधनांना अत्यंत महत्त्वाची आहे. 21 वी पशुगणना ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असल्यामुळे गणना करताना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात त बुलढाणा येथून खास उपस्थित असलेले मास्टर ट्रेनर डॉ. अमितकुमार दुबे यांनी पशु गणना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मूल्य शिक्षणासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी उपयुक्त;भाऊंच्या उद्यानात उदघाटन प्रसंगी मान्यवरांचे मत

Next Post

निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला ; विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo