Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी विविध मागण्यांसाठी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी विविध मागण्यांसाठी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

जळगाव, दि.७ – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव तर्फे सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत युवक प्रतिनिधी तेजस पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांचे मानधन ५ हजारावरून १० हजार करावे आणि स्वयंसेवकांना शासकीय प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी होती.

केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जळगाव विभागात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत असतात. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ स्वयंसेवक आपली भूमिका बजावतात. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनासोबत सर्व प्रकारच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होत असतात. तसेच युवा, खेळ मंत्रालय मार्फत देण्यात आलेले सर्व कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात पोहोचवण्यासाठी झटत असतात. उपक्रमातील ९० टक्के युवक हे ग्रामीण भागातील असतात. ग्रामीण भागातील स्वयंसेवकांना त्यांच्या आयुष्याच्या वळणावर आजच्या महागाईच्या काळात जे मानधन दिले जाते ते न परवडणारे असते. तरी देखील ते मनापासून काम करतात.

कोविड काळात सर्व युवा स्वयंसेवक यांनी जीवाची पर्वा न करता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सोबत सक्रिय कार्य केलेले आहे. सध्याची महागाई आणि स्वयंसेवकांचे कार्य लक्षात घेता राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांचे मानधन १० हजार रुपये करण्यात यावे आणि त्यांना केंद्र शासनाच्या इतर सुविधांचा किमान २ वर्ष लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, संदेश पाटील, चांदणी कोळी, नेहा पवार, मनोज पाटील, कल्पना पाटील, मुकेश भालेराव, राहुल वाघ, आनंदा वाघोडे, राहुल जाधव, पल्लवी तायडे, नेहा पवार, सागर नागने आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मु.जे.महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे एक दिवसीय व्याख्यान

Next Post

आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना दिले योगाचे धडे!

Next Post
आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना दिले योगाचे धडे!

आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना दिले योगाचे धडे!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo