Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
‘परिवर्तन’ जळगावचा नाट्य महोत्सव पुण्यात

जळगांव(प्रतिनीधी)- ‘परिवर्तन’ जळगाव यांच्या नाट्य व संगीत कलाकृतीचा तीन दिवसीय महोत्सव रतनलाल बाफना ज्वेलर्स व नाटकघर यांनी पुणे येथील  ज्योत्स्ना भोळे सभागृहात दिनांक ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केला आहे. ‘परिवर्तन’ जळगाव या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांनी जळगावच सांस्कृतिक विश्व समृद्ध केल आहे. ‘परिवर्तन’ निर्मित कलाकृती व कलावंत यांचे कार्यक्रम आता पुण्या, मुंबई येथे नियमित आयोजित केले जात आहेत. महोत्सव संस्कृती खान्देशामध्ये निर्माण करणाऱ्या ‘परिवर्तन’चा महोत्सव आता पुण्यात देखील होणार आहे. खान्देशामधील संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे हे पहिल्यांदा घडत आहे. खान्देशामधील सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी ही गोष्ट आहे. पुण्यात ३ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरवात दिनांक ३ जानेवारी  शुक्रवार  रोजी  सायंकाळी ७ वाजता शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित ‘गांधी नाकारायचाय… पण कसा ?’ हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील, विजय जैन सादर करणार आहेत. निर्मिती प्रमुख वसंत गायकवाड, विशाल कुलकर्णी आहेत. दिनांक ४ जानेवारी शनिवार रोजी ‘अमृता, साहिर, इमरोज’ हे दीर्घनाट्य होणार आहे. संकल्पना राहुल निंबाळकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे. हर्षदा कोल्हटकर, सुयोग गुरव आणि शंभू पाटील हे कलावंत याचं सादरीकरण करतील. निर्मिती प्रमुख अंजली पाटील व चंद्रकांत इंगळे आहेत. तसेच  श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील यांनी नाट्यरूपांतर केले असून योगेश पाटील दिग्दर्शित ” नली ” हे एकलनाट्य हर्षल पाटील सादर करणार आहेत. ५ जानेवारी रविवार रोजी ‘अरे संसार संसार’ हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. लेवागण बोली मधील बहिणाबाईंची कविता खान्देशामधील कलावंत आपल्या बोलीमधुन उलगडणार आहेत. संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे आहे.  या कार्यक्रमात मंजूषा भिडे, सोनाली पाटील, श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये, भूषण गुरव, योगेश पाटील, प्रतीक्षा जंगम, नयना पाटकर, हर्षल पाटील , शंभु पाटील हे कलावंत सादर करतील.  या महोत्सवाला पुणे येथील अतुल पेठे,  विनोद शिरसाठ, गोपाळ नेवे, मनोहर पाटील, बाबूराव भोर, शिवाजी सरोदे यांचे सहकार्य लाभत आहे. ‘गांधी नाकारायचाय…पण कसा ?’ या प्रयोगाला राष्ट्र सेवादल, महाराष्ट्र अंनिस, सा. साधना, हरिजन सेवक संघ या संस्थाचे सहकार्य लाभत आहे. ‘परिवर्तन’, जळगाव ही सांस्कृतिक व सामाजिक  संस्था आहे. या संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे. या संस्थेच्या या महोत्सवाचा पुण्यामधील रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अतुल पेठे व रतनलाल बाफना ज्वेलर्स यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

फिरोज शेख राज्यस्तरीय पर्यावरणरत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post

जळगांव जिल्हा मोटर ड्राइव्हीग स्कूल ओनर्स असोसिएशन ची स्थापना;अध्यक्षपदी जमील देशपांडे

Next Post

जळगांव जिल्हा मोटर ड्राइव्हीग स्कूल ओनर्स असोसिएशन ची स्थापना;अध्यक्षपदी जमील देशपांडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d