Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोऱ्यात शिवसेनेचे शिवसंवाद अभियान; प्रभाग निहाय घेणार समस्यांचा आढावा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
पाचोऱ्यात शिवसेनेचे शिवसंवाद अभियान; प्रभाग निहाय घेणार समस्यांचा आढावा

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील नगरपालिकेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी हजारो कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत तर अनेक कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत मात्र तरी देखील नागरिकांच्या काही समस्या बाकी राहत असतील तर त्या सोडवणुकीच्या दृष्टीने जनतेशी हितगुज करता यावे, विचारांचे आदानप्रदान व्हावे या प्रांजळ हेतूने शहर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण पाचोरा शहरात प्रभागनिहाय शिवसंवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली.

या अभियानाचे नेतृत्व मुकुंद आण्णा बिल्दीकर हे करणार असून त्याअंतर्गत प्रभाग एक व दोन येथे पालिका अंतर्गत कामांशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी संध्याकाळी आ.किशोर आप्पा पाटील यांचे अध्यक्षतेखाली प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांशी संवाद झाला यावेळी मंचावर मुकुंद आण्णा बिल्दींकर,शहर प्रमुख किशोर बारावकर, मनोज शांताराम पाटील, प्रवीण ब्राह्मणे, जगन निकम, शांताराम खैरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी जगन निकम यांचेसह अनेकांनी आ.किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास करत हातावर शिवबंधन बांधत भगवा गळ्यात टाकला. यावेळी प्रभागातील सर्वांगीण विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिल्लक राहिलेले कामे त्वरित पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली यावेळी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी आपल्या भाषणातून शिरपूर प्रमाणे पाचोरा पॅटर्न यापुढे राज्यात चर्चेत येईल अशा पद्धतीने विकास कामांचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. मंगळवारी प्रभाग क्रमांक दोन मध्ये मुकुंद आण्णां बिल्दींकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली.

बैठक संपन्न झाली यावेळी प्रभाग दोन मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन समस्यांचा पाढा वाचला, शिवसेनेच्या वतीने या सर्व समस्या लिहून घेण्यात आल्या यावेळी बोलतांना मुकुंद बिल्दींकर यांनी आमदार किशोर आप्पां पाटील व नगरपालिकेच्यावतीने प्रभागासाठी करण्यात आलेल्या कामांवर प्रकाश टाकत सर्व मुस्लिम बांधव आ.किशोर अप्पा पाटील व शिवसेनेच्या कायम पाठीशी असल्याने आपल्या बांधवांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर आगामी पंधरा दिवसात तोडगा काढून समस्यां सोडविणार असल्याचे शब्द दिला.

यावेळी माजी जेष्ठ नगरसेवक रसूल उस्मान, शहर प्रमुख किशोर बारावकर, लतीफ खान, माजी नगरसेवक अय्युब बागवान, डॉ.भरत पाटील, शाकिर बागवान, जावेद शेख, प्रवीण ब्राम्हणे, सलीम शेख, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील यांचेसह परिसरातील तरुण व नागरिकांची मोठी गर्दी होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन साजिद कुरेशी यांनी केले.

Team Satymev Jayate

Previous Post

अन्न परवाना, नोंदणी, नूतनीकरण संदर्भात मार्गदर्शन शिबीर

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Next Post
सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo