Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यालाबापट समर्थकांची दांडी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

पुणे– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिवसभरात विविध कार्यक्रम-बैठकांना हजर राहून जनसंपर्काचा धडाका लावला. मात्र, या कार्यक्रमांना माजी पालकमंत्री तथा खासदार गिरीश बापट यांच्या समर्थकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. त्यामुळे येत्या का‌ळात पुणे शहरात ‘दादा विरुद्ध भाऊ’ अशी नवी समीकरणे आकार घेत असल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे.

पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी दिवसभर पुण्यात विविध कार्यक्रम घेतले. ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयात बैठक, प्राधिकरणातील समस्यांचा आढावा, पुणे विद्यापीठ, विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक, जिल्हा परिषदेमध्ये आढावा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक तसेच महापौर बंगला येथे नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

या दौऱ्यामध्ये बापट समर्थक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी पाटील यांच्या दौऱ्यापासून दूर राहणे पसंत केल्याचे दिसून आले. महापौर बंगला येथे झालेल्या गाठीभेटीच्या कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह मोजके कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची उपस्थिती तसेच त्यांच्या समर्थकांची संख्या लक्षणीय होती. आमदार भीमराव तापकीर आणि विजय काळे उपस्थित होते. शहर आणि जिल्ह्यातून पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

शेडेकर कुटुंबीयांची भेट

आमदार नीतेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी कणकवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली. शेडेकर यांचे कुटुंबीय पुण्यात कात्रज परिसरात राहतात. पालकमंत्री पाटील यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असे आश्वासन दिले. ‘माझ्या मुलाचा काय दोष, त्याच्या प्रामाणिकपणाची त्याला ही शिक्षा आहे का?’ असा प्रश्न शेडेकर यांच्या आईने पाटील यांच्यासमोर उपस्थित केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अजिंठा-वेरूळ लेण्या होणार वर्ल्ड क्लास साइट

Next Post

नोटा खाणाऱ्याला कोठडी

Next Post

नोटा खाणाऱ्याला कोठडी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo