Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोटा खाणाऱ्याला कोठडी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

 पुणे – शिवाजीनगर कोर्टात लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिकाला कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या लिपिकाने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गोंधळ घालत नोटा तोंडात घातल्याचा प्रकार कारवाईदरम्यान घडला होता. पंचाने  नाक दाबून तोंडात बोटे घालून तेथे उपस्थित असलेल्यांसमोर नोटा बाहेर काढल्या होत्या. प्रसन्नकुमार गणपतराव भागवत (वय ५०, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथील ३१ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदारांच्या भावाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्याचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याची प्रत देण्यासाठी लाच मागण्यात आली. या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. लिपिक भागवतला शुक्रवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. बचाव पक्षातर्फे अॅड. शाहिद अख्तर, अॅड. पल्लवी वाव्हळ, अॅड. विवेक भरगुडे, अॅड. कुमार पागयुडे यांनी काम पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यालाबापट समर्थकांची दांडी

Next Post

सहकारी बँका दुर्लक्षित

Next Post
सहकारी बँका दुर्लक्षित

सहकारी बँका दुर्लक्षित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo