जळगाव- (जिमाका वृत्तसेवा)-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलाचे), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ०८ ऑक्टोंबर, २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलाचे), नॅशनल हायवे क्र.०६ जळगाव या ठिकाणी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर निवडसंधी) मध्ये प्रामुख्याने यात खान्देश मोटर्स जळगाव (१० वी १२ वी पास तसेच आय.टी.आय सर्व ट्रेड), छबी इलेक्ट्रीकल (१० वी १२ वी पास तसेच आय.टी.आय सर्व ट्रेड), व एस.पी फॉर्मासिटीकल, जळगाव यात अकाउंटंट या पदाकरीता (बी. कॉम शाखेचा पदवीधर, ऑफिस बॉय, हेल्पर ग्रॅन्युलेशन व हेल्पर पॅकिंग या पदाकरीता (१२ वी पास) असे तीन नांमाकित उद्योजक उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात पात्रता धारण करणा-या ईच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभघेण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी आपल्या युजर आयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन अॅप्लाय करावा. तसेच ज्या उमेदवारांनी नांव नोदणी केलेली नाही त्यांनी देखिल सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्रांऊड जवळ, या कार्यालयाशी प्रत्यक्ष भेटी व्दवारे किंवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ २९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव प्रसिध्दी पत्रकान्वये यांनी केले आहे.











