Friday, August 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात जळगाव येथील अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कर्नाटक येथील ‘राजेंद्र ट्रेड लिंक’ आणि तिचे दोन भागीदार मिथुन सुरेश जैन व प्रशांत प्रकाश जैन यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपींना सहा महिने साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच जैन इरिगेशन कंपनीला एकूण १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. विद्यमान कायद्यातील तरतुदीनुसार धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयाकडून जलदगतीने कठोर कारवाई केली जात आहे, हे या निकालावरुन दिसून आले.

कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील रनेबेन्नुर येथील राजेंद्र ट्रेड लिंक या भागीदारी संस्थेने जैन इरिगेशन कंपनीकडून घेतलेल्या मालाच्या देय रकमेपोटी ५४ लाख १० हजार २९४ रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत सादर केला असता तो अनादरीत झाला. यानंतर कंपनीने कायदेशीर नोटीस पाठवूनही आरोपींनी रक्कम अदा केली नाही. अखेर याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून निकाल दिला. न्यायालयाने दिलेल्या निकालात १ कोटी ८ लाख २० हजार ५८८ रुपये जैन इरिगेशनला देण्याचे आदेश दिले आहे. तसेच आरोपींना ६ महिने साधा कारावास शिक्षा सुनावली आहे. कायदेशीर कारवाईचा खर्च म्हणून जैन इरिगेशन कंपनीला अतिरिक्त १५ हजार रुपये देण्याचे आदेशही निकालात दिले आहे. जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने ॲड. निशांत सुशील अत्रे यांनी प्रभावीपणे न्यायालयात युक्तीवाद करून कंपनी बाजू मांडली.

कायद्याचा दणका

धनादेश अनादर हे ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, १८८१’ मधील कलम १३८ नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. यामध्ये धनादेशाच्या रकमेच्या दुप्पट दंड आणि २ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या निकालामुळे कायदेशीर व्यवहारात पारदर्शकता ठेवणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

Next Post

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

Next Post
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात 'आत्मनिर्भर युवती अभियान' उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo