Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“फटाके नाही, आजार नाही” ; सामाजिक संघटनांचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

‘पोस्ट कोविड’ रुग्णांनी फटाक्यांपासून लांब राहावे : डॉ. विजय गायकवाड

जळगाव : आनंदाचा आणि मांगल्याचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करता दिवाळीत हानिकारक ठरत असणारे फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी पुस्तके, शालेय वस्तू, कपडे इत्यादी गरजू वस्तू देऊन विधायक पद्धतीने आनंद वाटावा आणि फटाकेमुक्त दीपावली साजरी करावी, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. तसेच, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी मात्र फटाक्यांपासून लांब राहावे, फटाक्यातील धूर त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दीपावली उत्सव २०२१ मार्गदर्शक सूचनेतही नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळी सणामध्ये, आनंदाच्या क्षणावेळी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले जातात. मात्र, फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते. तसेच फटाक्यांच्या ध्वनीमुळे ध्वनीप्रदूषण होते. फटाके बनविणाऱ्या कारखान्यात बहुतांश लहान मुले काम करतात. त्यामुळे बाल कामगार प्रथेला चालना मिळते. अनेक जीवघेणे अपघात होतात. अनेक जण जखमी होतात. पशु पक्षी देखील जखमी होवून त्यांना त्रास होतो. पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. अशा तोट्यांमुळे फटाके फोडून करोडो रुपयांचा धूर काढण्यापेक्षा त्याला विधायक पर्याय दिला गेला पाहिजे. यंदा कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने गरजू बांधवाना मदत केली पाहिजे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे यांनी सांगितले.

फटाक्यांऐवजी किल्ले बांधणे, कुटुंबासह सहलीला जाणे, चांगली पुस्तके घेवून ती वाचणे, मैदानी विविध खेळ खेळून शरीर तंदुरुस्त ठेवणे, मुलांना बौद्धिक खेळणी घेऊन देणे, गरीब वस्त्यामध्ये तसेच गरजूंना मिठाई, कपडे, फराळ, पुस्तके वाटणे किवा घरी कोणी आजारी असेल तर त्यासाठी पैसे देणे असे उपक्रम नागरिकांनी राबवावे जेणेकरून सामाजिक बांधिलकी जोपासली जाणार आहे.

फटाकेमुक्त दिवाळी अभियानात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, वर्धिष्णू बहुद्देशीय सामाजिक संस्था, जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळ, जळगाव, राष्ट्रीय हरित सेना, प्रवीण पाटील फाउंडेशन, जनमत प्रतिष्ठान, डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी उपक्रम, संघर्ष दिव्यांग बहुद्देशीय संस्था, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जिंदगी फाउंडेशन आदी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

“पोस्ट कोविड” रुग्णांची काळजी घेतली पाहिजे

गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीच्या दोन भीषण लाटा येऊन गेल्या. त्यात जिल्ह्यातील हजारो नागरिक मृत्युमुखी पडले.अनेक जण कोरोना आजारातून बरे झाले. मात्र कोरोनानंतरहि शरीरात या आजाराची अंश असतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणाला कोरोना होऊन गेला असेल तर त्यांनी त्यांच्या घराजवळ फटाके फोडणे टाळावे. फटाके उडवायचेच असतील तर मोकळ्या मैदानात कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाजवावेत. मास्कचा कायम वापर करावा. जेणेकरून फटाक्यातील विषारी धुरापासून दूर राहता येईल. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या शरीरात फटाक्यांचा विषारी धूर गेला तर त्यांच्या छाती, यकृत, फुफ्फुसाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तत्काळ रुग्णालयात तपासणीसाठी आणावे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड विभाग इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

Next Post

जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Next Post
जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d