Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीमेचे आयोजन

जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 28 – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील दि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक 01/01/2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणा-या या कार्यक्रमाची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे :

  1. एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी : दि. 1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार)
  2. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी : दि. 1 नोव्हेंबर (सोमवार) ते दि. 30 नोव्हेबर, 2021 (मंगळवार)
  3. विशेष मोहिमांचा कालावधी : 1) दि.13 नोव्हेंबर, (शनिवार) व दि.14 नोव्हेंबर, 2021 (रविवार) आणि दि. 27 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दि. 28 नोव्हेंबर, 2021 (रविवार)
  4. दावे व हरकती निकालात काढणे : दि. 20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत.
  5. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे : दि. 5 जानेवारी, 2022 (बुधवार)

जिल्ह्यातील रहिवाश्यांनी दि. 1 नोंव्हेबर, 2021 ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे योग्य तो फॉर्म – नमुना नोंदविण्याचे आवाहन श्री. राऊत यांनी यावेळी केले.
1) फॉर्म – नमूना नं. 6 – नव्याने मतदार नोंदणी करणे.
2) फॉर्म – नमूना नं. 7 – मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणेकामी.
3) फॉर्म – नमूना नं. 8 – मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्याकरिता.
4) फॉर्म – नमूना नं. 8 अ – मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता

दि.1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यांने नाव नोंदणी करण्याचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना भारत निवडणूक आयोग यांनी पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती/कायमस्वरुपी स्थानात बदल/मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील.
मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ङाॅ.मनोज अ.शेटे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T..I) येथे आज मोफत COVID लसीकरण शिबिर

Next Post

“फटाके नाही, आजार नाही” ; सामाजिक संघटनांचे आवाहन

Next Post

"फटाके नाही, आजार नाही" ; सामाजिक संघटनांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo