Saturday, November 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालगंधर्व महोत्सवात ‘बहुत दिन बिते..’ बंदिशची अनुभूती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/01/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
बालगंधर्व महोत्सवात ‘बहुत दिन बिते..’ बंदिशची अनुभूती

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाची थाटात सुरवात; आज शास्त्रीय गायनासह कथक नृत्याची मेजवानी

जळगाव – (प्रतिनिधी) – शास्त्रीय संगीता बरोबरच उपशास्त्रीय संगीताची रेश्मा आणि रमैय्या भट यांनी मेजवानी दिली. हरहुन्नरी दोन्ही भगिनींची संगीत सेवा जुगल बंदितुन याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली. सर्व प्रथम राग पुरीया धनाश्री मधील विलंबीत एकतालातील बडा ख्याल ‘गावे गुणीजन’ तर द्रुत तीनतालातील ‘बहुत दिन बिते’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर राग कलावतीमधील तिन तालातील बंदिश ‘सपनो में आया’ सादर झाली. त्यानंतर कानडा राग संगीतातील श्याम निने हे पद सादर केले. त्यानंतर पं.भिमसेन जोशी यांनी गाऊन अजमार केलेल्या दोन रचना नारायण भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, बाजे मुरलिया बाजे रे यासह हे सूरांनो चंद्र व्हा व नारायणा रमा रमणा ह्या नाट्यटपदाने मैफिलीचा समारोप झाला. त्यांना संवादिनीवर अभिशेक रवांदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत केली. तानपुरा वर अनघा गोडबोले, ऐश्वर्या परदेशी यांनी साथ संगत केली.

द्वितीय सत्र जुगलबंदीने सादर झाले. यामध्ये कोलकाता येथील भाऊ व बहीणीने बासरी व गायनाची जुगलबंदी सादर केली. केवळ १५ वर्षांचा अनिरबन रॉय व त्याची बहिण मैत्रेयी रॉय हे ते दोन कलावंत सन २०२२ मध्ये कलर्स टिव्ही वरील गाजलेला रीऍलिटी शो ‘होनरबाज देश कि शान’ मधील आपल्या सादरीकरणाने अनिरबनने संपुर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले होते.
त्यांना तबल्याची साथ कोलकात्याची रींपा शिवा यांनी केली.

‘ध्यास निरंतर स्वर साधनेचा’ या थिमवर असणारा, अभिजात संगीताचा, कान्हदेशच्या रसिकांच्या सांस्कृतिक कक्षा रुंदावणाऱ्या बालगंधर्व संगीत महोत्सवास आज आरंभ झाला. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात सुरेल मैफिल रंगली. दीपक चांदोरकर यांनी सुरवातीला ‘गुरुवंदना’ सादर केली. गतवर्षी या जगाचा निरोप घेतलेल्या प्रभा अत्रे, पं. भवानी शंकर, रशीद खान, पं. झाकीर हुसेन इत्यादी कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने व जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स, जळगाव जनता सहकारी बँक, जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या महोत्सवास चांदोरकर टेक्नॉलॉजीसचे तांत्रिक सौजन्य लाभले असून रेडिओ पार्टनर माय एफ एम हे आहेत.

दीपप्रज्वलनावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रिजनल व्यवस्थापक ए व्ही रमण मूर्ती, जळगाव जनता सहकारी बँकच्या संचालिका आरती हुजूरबाजार, प्रा. शिल्पा बेंडाळे,
गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, माय एफ एम चे आर जे देवा, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि चे अवधुत घोडगावकर, व्हि एम भट, यांची उपस्थिती होती. स्व.चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे, नूपूर खटावकर व पदाधिकारी यांनी मान्यवरांसह मंचावरील कलावंतांचे स्वागत केले.

आज कथक नृत्यासह शास्त्रिय गायनाची मेजवानी

श्रींजीनी कुलकर्णी (कथक) विवेक मिश्रा (तबला) सामी उल्लाह खान (गायन) प्राजक्ता गुर्जर (सतार) अश्विनी सोनी (पढंत) तर द्वितीय सत्रात अनिरुद्ध आयठल यांचे शास्त्रिय उपशास्त्रीय गायन त्यांना रामकृष्ण करंबेळकर (तबला) तर अभिनव रवंदे (संवादिनी) हे कलाकार आपली कला सादर करतील.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ओरीअन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी;शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने

Next Post
बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी;शास्त्रीय गायनात तरणा ‘तोम ता देरेना’ ने जिंकली मने

बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्यक नृत्यविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी;शास्त्रीय गायनात तरणा 'तोम ता देरेना' ने जिंकली मने

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

बोदवडकरांची प्रतीक्षा संपली! नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे लवकरच पदभार स्वीकारणार; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

बोदवडकरांची प्रतीक्षा संपली! नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे लवकरच पदभार स्वीकारणार; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d