Tuesday, December 16, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवडकरांची प्रतीक्षा संपली! नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे लवकरच पदभार स्वीकारणार; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
बोदवडकरांची प्रतीक्षा संपली! नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे लवकरच पदभार स्वीकारणार; नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

बोदवड-(प्रतिनिधी) – तालुक्यातील नागरिकांची पूर्णवेळ तहसीलदारासाठी असलेली प्रतीक्षा आता अखेर थांबणार आहे. अक्राणी तालुक्याचे (जि. नंदुरबार) तहसीलदार ज्ञानेश्वर पंडित सपकाळे यांची बोदवड येथे तहसीलदार म्हणून बदली झाली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे.

​बोदवड तहसीलदाराचे पद गेल्या अनेक दिवसांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होते. परिणामी, तालुक्यातील नागरिकांच्या महसूल संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली होती. रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा विचार, अनुदानाचे पंचनामे आणि इतर शासकीय कागदपत्रे काढताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे अनेक कामांना विलंब होत होता.

​आता मात्र पूर्णवेळ व समर्पित तहसीलदार मिळणार असल्याने नागरिकांना होणारा हा त्रास पूर्णपणे थांबणार आहे. नवनियुक्त तहसीलदार ज्ञानेश्वर पंडित सपकाळे यांच्याकडून नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे बोदवड तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​शासकीय आदेशानुसार बदली:

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय यांच्या शासन आदेश क्र. बदली-२०२५/प्र.क्र.२१५/आस्था-३ नुसार श्री. ज्ञानेश्वर पंडित सपकाळे यांची बोदवड येथे बदली झाली आहे. ते अक्राणी तालुक्याचे (जि. नंदुरबार) तहसीलदार म्हणून कार्यरत होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी नाट्यचळवळ महत्वाची : परिसंवादातील सुर

Next Post

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

Next Post
नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा संकल्प!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d