Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘भाऊंना भावांजली’ महोत्सवांतर्गत ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन-जिल्ह्यातील चित्रकारांची सृजन लाॅकडाऊन चित्रकला

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘भाऊंना भावांजली’ महोत्सवांतर्गत ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन-जिल्ह्यातील चित्रकारांची सृजन लाॅकडाऊन चित्रकला

जळगाव(दि.16)प्रतिनिधी- संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाची सुरूवात जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन यांच्याहस्ते भाऊंच्या उद्यानातील चित्रकार वसंत वानखेडे कलादालनात झाले.

या चित्रप्रदर्शनात राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हारा, विजय जैन, शाम कुमावत, पिसुर्वो सुरळकर या सहा प्रसिद्ध चित्रकारांसह निलेश शिंपी, ओशीन मलारा, प्रसेन बाविस्कर या युवा चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. या चित्र प्रदर्शंनास खासदार उन्मेश पाटील यांनी भेट देऊन चित्रकारांची संवाद साधला व चित्रे समजावून घेतली. या प्रदर्शनात लाॅकडाऊनच्या अस्वस्थ दिवसात साकारलेली राजू महाजन यांची निसर्गाशी भासमय संवाद करणारी सृजनानंद देणारी रचना चित्रे, राजू बाविस्कर यांची समाजभान देणारी चेहरे हरवलेली, विषण्ण करणारी चित्रे, विकास मलारा यांची काळ्यापांढर्‍या रंगसंगत करडयाच्या विविधतेने नटलेली छायाभासी अमूर्त चित्रे, श्याम कुमावत यांची अजिंठा खजुराहोचा अभिजात वारसा सांगणारी रेषा लालित्य असलेली जलरंग चित्रे, विजय जैन यांची गुढतेला स्पर्श करणारी अमूर्त चित्रे, पिसुर्वो सुरळकर यांची मनावर कोरणारी ठासीव, समकालीन प्रवाहातील उस्फूर्त आवेगी चित्रे, निलेश शिंपी यांची जगण्यातील संघर्ष अधोरेखित करणारी सृजनचित्रे, ओशीन मलारा यांची जलरंगातील पारदर्शी नजाकत ल्यालेली हळूवार रेषात्म व्यक्तिचेहरे चित्रे, प्रसेन बाविस्कर यांची ‘टू बी ऑर नॉट टू बी’ मन द्वंद्व दर्शवणारी उस्फूर्त रचनाचित्रे मांडलेली आहेत. हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. चित्र साक्षरता समाजात रूजावी, चित्रास्वाद घडावा म्हणून कला रसिकांनी या चित्रप्रदर्शनात आवर्जून भेट द्यावी असे आवाहन परिवर्तन तर्फे शंभू पाटील यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

महाविद्यालय हे सर्वांगीण विकासाचे ज्ञानमंदिर- प्राचार्य डॉ पी आर चौधरी

Next Post
महाविद्यालय हे सर्वांगीण विकासाचे ज्ञानमंदिर- प्राचार्य डॉ पी आर चौधरी

महाविद्यालय हे सर्वांगीण विकासाचे ज्ञानमंदिर- प्राचार्य डॉ पी आर चौधरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d