Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे प्रार्थना सभाव रिमेंबरींग गांधी कार्यक्रमांचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे प्रार्थना सभाव रिमेंबरींग गांधी कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव, दि. 29 (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उद्या दि. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधी तीर्थ मधे निमंत्रितांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे दुपारी 3 वाजता रिमेंबरींग गांधी या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधींचे कृतज्ञता पूर्वक स्मरण “रिमेंबरींग बापू” या ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय अड मॅन आणि स्पेस डिझाइनर उदय पारकर आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर, तर विशेष उपस्थिती म्हणून संचालक अशोक जैन राहतील. जीवनातील साधेपणा यावर उदय पारकर तर आज गांधीजींची प्रासंगिकता या विषयावर वासुदेव कामत मार्गदर्शन करणार आहेत. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जनमानसात सर्जनशील दृष्टिकोणातून कला निर्माण करणे आणि महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित चिरंतन समाज अंमलात आणण्याच्या उद्देशाने ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला आणि आंतराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांकरिता ‘क्रिएटीव गांधी’, ‘कोरोना ने शिकवले’, ‘ग्रीन अर्थ- ग्रीन लाईफ’ असे विषय देण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेसाठी एकूण तीन गट होते तर पोस्टर्स साठी दोन गट होते. चित्रकलेसाठीचा प्रथम गट – इयत्ता ५ वी ते ८ वी, द्वितीय गट – ९ वी ते १२वी आणि तृतीय गट – महाविद्यालयीन तथा खुला गट होते या तीनही गटांमधे एकूण 895 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. तर पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम गट – फाईन आर्ट व महाविद्यालयीन विद्यार्थी तर दुसरा गट- कला क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी होता. यामधे एकूण 359 स्पर्धकांनी भाग घेतला. यात भारतासह थायलंड, मलेशिया व अमेरिकामधील स्पर्धकांचा सहभाग होता. यातील विजेत्यांची घोषणा उपरोक्त रिमेंबरींग गांधी कार्यक्रमामधेच करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या जाहिर कार्यक्रमांचे आयोजन करता येत नसल्याने, उद्या सकाळी विशेष निमंत्रितांसाठी गांधी तीर्थच्या प्रार्थनास्थळावर सकाळी 9:30 वा. भावांजली कार्यक्रमाचे आयोजन करोना नियमांचे पालन करून करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम नंतर गांधीतीर्थच्या फेसबुकच्या https://www.facebook.com/gandhiteerth/live वर पाहता येईल.

महात्मा गांधीजींना मौन पाळून श्रद्धांजली

महात्मा गांधीजींची हत्या संध्याकाळी 5.17 मिनिटांनी केली गेली होती. त्याचवेळी सर्व नागरिकांनी, संस्थांनी व आस्थापनांनी दोन मिनीटे मौन पाळून गांधीजींचे स्मरण करावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अयोध्या नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान

Next Post

वडजी टी .आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा

Next Post
वडजी टी .आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा

वडजी टी .आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d