Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महिला स्वच्छतागृहांसाठी निधी फाऊंडेशन करणार जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महिला स्वच्छतागृहांसाठी निधी फाऊंडेशन करणार जनजागृती

पोस्टरचे महिला मान्यवरांच्या हस्ते अनावरण : जिल्हाभर लावणार पोस्टर

जळगाव-(प्रतिनिधी) – शहरात नुकतेच एक 65 वर्षीय महिला कारच्या आडोशाला लघुशंकेला बसल्याने तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकाराची तात्काळ दखल घेत निधी फाऊंडेशनच्या वैशाली विसपुते यांनी महिला स्वच्छतागृहांविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. निधी फाऊंडेशनतर्फे तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण शनिवारी महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भोईटेनगर स्थित निधी फाऊंडेशनच्या आवारात करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहराच्या प्रथम नागरिक महापौर भारती सोनवणे, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, डॉ.श्रध्दा चांडक, आयएनआयएफडीच्या संचालिका संगीता पाटील उपस्थित होत्या.

राईट टू पी कायद्यानुसार कोणत्याही हॉटेल किंवा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह महिलांना मोफत वापरू देणे बंधनकारक आहे. बहुतांश महिलांना याबाबत माहिती नसल्याने त्या लघुशंका रोखून ठेवतात किंवा आडोसा शोधतात. लघुशंका रोखून ठेवल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हॉटेल्स किंवा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महिलांना लक्ष द्या.. या मथळ्याखाली काही पोस्टर फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी तयार केले आहे. शनिवारी त्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी जळगाव महिला व बाल सहाय्य कक्षाच्या समन्वयक विद्या सोनार, शोभा हंडोरे, भुसावळच्या समन्वयक भारती रंधे, साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी, निवेदिता ताठे, स्मिता वेद, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या हेतल वाणी, स्वाती सोनगिरे आदी उपस्थित होत्या.

उपक्रमाचे कौतुक, सहकार्याचे आश्वासन

निधी फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात महिलांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत सर्व महिला मान्यवरांनी व्यक्त केले. महानगरपालिकेतर्फे याबाबत आदेश पारीत करण्याचे आश्वासन महापौर भारती सोनवणे व स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी दिले. तसेच उपक्रमासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके यांनी दिले.

खा.सुप्रिया सुळेंकडून फेसबुक पोस्ट शेअर

राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांना घडलेल्या घटनेची आणि निधी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची वैशाली विसपुते यांनी माहिती दिली. खा.सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत राज्यस्तरावर देखील त्याची दखल घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, खा.सुप्रिया सुळे यांनी निधी फाऊंडेशनच्या उपक्रमाची दखल घेत पोस्टर अनावरणचा फोटो त्यांच्या फेसबुक पेजवरून देखील शेअर केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“सुधर्माच्या 65 विद्यार्थ्यांनी पाहिली भारत सर्कस”

Next Post

बाबा रामदेव यांनी प्रत्येकापर्यंत पोहचवली संस्कृती! श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश

Next Post

बाबा रामदेव यांनी प्रत्येकापर्यंत पोहचवली संस्कृती! श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo