Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाबा रामदेव यांनी प्रत्येकापर्यंत पोहचवली संस्कृती! श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

भव्य महाआरतीने भगवान रामदेवजी बाबा कथेचा समारोप

जळगाव-(प्रतिनिधी) – भगवान रामदेवजी बाबा स्वतः देव आहेत आणि सोबत लक्ष्मी माता देखील आहे. ज्याठिकाणी लक्ष्मी मातेचा वास असतो तिथे धनाची कोणतीही कमी नसते. धरतीवर जेव्हा जेव्हा पाप वाढतो. राक्षसी लोकांमुळे भक्त आणि ब्राम्हणांना त्रास होतो तेव्हा मी पुन्हा पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी जन्म घेतो. भैरव राक्षसाचा वध करणे आणि सर्व जाती धर्मातील भेदभाव दूर करण्याचा भगवान रामदेव यांनी प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीला प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले असे श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांनी भाविकांना निरूपण करताना सांगितले.

येथील शिवतीर्थ मैदानावर आमदार राजुमामा भोळे, श्री रामदेवजी बाबा सत्संग समिति आणि चैतन्य साधक परिवार समितितर्फे आयोजित सात दिवसीय भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृत सत्संगाचा शनिवारी समारोप झाला.

श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी पुढे सांगितले की, अनेक लोकांना आपल्या आत्म्याचे, परमात्म्याचे आणि आपण पृथ्वीवर का आलो आहे याची लोकांना जाणीव होण्यासाठी भगवान रामदेवजी बाबा देखील कथा, सत्संग करायचे. आपण मानव जन्म घेवून पृथ्वीवर आलो आहेत तर हरी भजन करायला हवे. हरी भजनात सार आहे. भगवान सांगतात आपण ईश्वराचे अंश आहात. आपली आत्मा परमेश्वराचा अंश आहे. जेव्हा मनातील भेद मिटतो तेव्हा तो स्वतःलाच ब्रम्ह समजतो, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते महाआरती

भगवान रामदेवजी बाबा यांच्या कथेच्या समारोपप्रसंगी महाआरती करण्यात आली. सुरूवातीला कथेसाठी सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महाआरतीप्रसंगी आ.राजुमामा भोळे, आ.चंदुभाई पटेल, आ.लताताई सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, राजु बांगर आदींसह इतर मान्यवर, संत, महाराज उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महिला स्वच्छतागृहांसाठी निधी फाऊंडेशन करणार जनजागृती

Next Post

राष्ट्रीय विज्ञानदिन निमित्ताने प्रदर्शन आयोजन

Next Post

राष्ट्रीय विज्ञानदिन निमित्ताने प्रदर्शन आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo