जळगांव (प्रतिनिधी- डॉ धर्मेन्द्र पालवे )- जळगांव तालुक्यातील आमोदे बु येथील विनायक शामराव सुर्यवंशी वय 70वर्ष आणि मिनाबाई विनायक सुर्यवंशी वय 65 वर्ष यांना त्याच्याच मुलगा शशीकांत सूर्यवंशी वय40वर्ष यांनी राहत्या घरातून शेती व घर नावे करून देण्याच्या मागणीवर धमकावत घरातून हाकलून लावले. शशिकांत यांचे स्वतःचे मालकीचे दुसरे घर असूनही वडिलांच्या घरावर कबजा केल्याचं चित्र आहे, या त्रासाला कटाळून वृद्ध दाम्पत्य बेघर झाले आहे,लावरीस झाले आहे, कृतज्ञ मुलगा बँकेत नोकरी करत असून स्वतःचे आईवडील यांना घरतजन बेदखल केलं आहे.अश्या घटना पाहात सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या सदर सारखा गुन्हा हा क्रिमिनल प्रकारचा गुन्हा आहे असा निर्णय दिला आहे, त्या आधारित या दाम्पत्यानी गुन्हा दाखल करण्याची विनंती जेष्ठ समाज सेवक तथा जिल्हा जागृत जनमंच चे संस्थापक मा शिवराम पाटील यांची भेट घेत केली.सदर प्रकरण हाताळता मा शिवराम पाटील यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधता या प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा करावा असे सुचवले आणि त्यावर तहसीलदार यांनी दोन दिवसाच्या मुदतीवर न्याय देणार असल्याचे व वृद्ध दापत्यास न्याय आश्वसनही दिले.











