Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुंबई,पुण्याच्या धर्तीवर चोपडा महाविद्यालयात दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण-अध्यक्ष संदीप पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मुंबई,पुण्याच्या धर्तीवर चोपडा महाविद्यालयात  दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण-अध्यक्ष संदीप पाटील

चोपडा ( प्रतिनिधी )येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या स्थापनेला जून २०१९ मध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाले असून संस्थेच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त वर्षभर संस्थेतर्फे विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.पन्नास वर्षा पूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, विविध कोर्सेच्या माध्यमातून चोपडा महाविद्यालयात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रत्येक विभागाला स्वतंत्र प्रशस्त इमारती,अत्याधुनिक यंत्र सामुग्री दर्जेदार शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.महाविद्यालयात विद्यार्थ्यां मधील रॅगिंग रोखण्यासाठी अँटी रॅगिंग समितीची स्थापन करण्यात आली असून कोणत्याही विद्यार्थिनीला त्रास होणार नाही याची खबरदारी रॅगिंग समिती घेत असल्याची माहिती महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड.संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्या बद्दल महाविद्यालयात आज सकाळी १० वाजता आयोजित पत्रकार
परिषदेत अॅड.संदीप पाटील बोलत होते. चोपडा तालुक्यातील आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी जून १९६९ मध्ये माजी आमदार डॉ.सुरेश पाटील व सहकाऱ्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली.सुरुवातीच्या कालखंडात १४४ विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाचा कारभार सुरू झाला.स्वतःची इमारत नसल्याने विज्ञान आणि कला व वाणिज्य विभागातील वर्ग प्रताप विद्या मंदिर आणि म्युनिसिपल हायस्कुल मध्ये वर्ग भरत असतांना संस्थेने यावल रोड लगत ३५ एकर जमीन घेऊन तिथे स्वतःची इमारत उभी केली.त्या इमारतीचे १९७४ मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री स्व.मधुकरराव चौधरी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या.त्यानंतर बांधलेल्या दुसऱ्या इमारतीचे १९८१ मध्ये माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेने घेतलेल्या ३५ एकर जमिनीची किंमत दोनशे कोटी तर महाविद्यालयातील सर्व विभागांच्या प्रशस्त इमारतीचे मूल्य १७५ कोटी रुपये आहे.सर्वांच्या सहकार्याने लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचा वटवृक्ष बघायला मिळत आहे.तालुक्याच्या सर्वांगिण विकासा मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाचा सिंहाचा वाटा आहे.चोपड्या सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात विविध कोर्सेच्या माध्यमातून महाविद्यालयात मुंबई,पुण्याच्या धर्तीवर दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श समाज घडविण्याचे काम
संस्था करीत आहे असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अड.संदीप पाटील यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए. सूर्यवंशी,माजी उपप्राचार्य तथा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा.डी.बी.देशमुख उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सेक्सः लग्नाआधी का केवळ लग्नानंतर?

Next Post

प्रसाद ने मनाली ते लेह-लडाख ६५० की.मी. प्रवास केला सायकलने

Next Post
प्रसाद ने मनाली ते लेह-लडाख ६५० की.मी. प्रवास केला सायकलने

प्रसाद ने मनाली ते लेह-लडाख ६५० की.मी. प्रवास केला सायकलने

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo