Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबाबत २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मुंबई, ठाण्यात गैरप्रकाराबाबत २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरिता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत आतापर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

1) एकूण 13 अधिकृत शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 

2) एकूण 4 अधिकृत शिधावाटप दुकाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

3) एकूण 12 अधिकृत शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

4) प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकामार्फत 3 ठिकाणी धाडी टाकून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अ) दिनांक 04 एप्रिल 2020 रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.41-फ-218 येथे 1200 कि.ग्रॅ. अतिरिक्त गहू, जप्त  मुद्देमालाची किंमत रुपये 30,072/-, गुन्हा नोंद क्र.233/2020, नयानगर पोलीस ठाणे, जि.ठाणे.

ब) दिनांक 06.जून.2020 रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.33-ई-143 येथे टेम्पो क्र.एम.एच.-03-सी.पी.-3397, तांदूळ 2783 कि.ग्रॅ. व गहू 446 कि.ग्रॅ. अतिरिक्त, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 4,61,420/-, गुन्हा नोंद क्र.167/2020, टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.

क) दिनांक 09.जून.2020 रोजी तुर्भे येथे पेट्रोल/डिझेल टँकर क्र.एम.एच.-06-बी.डी.-3777 मधून अवैधरित्या डिझेल चोरी प्रकरणी जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 33,15,692/-, गुन्हा नोंद क्र.203/2020, तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, नवी मुंबई.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोविड केअर हेल्प ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागात “आरोग्य तपासणी शिबीर” संपन्न; विविध संस्थांचा पुढाकार

Next Post

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख गुन्हे ५४ हजार गुन्हे दाखल

Next Post
कोविडसंदर्भात राज्यात १ लाख गुन्हे ५४ हजार गुन्हे दाखल

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख गुन्हे ५४ हजार गुन्हे दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo