लोहारा ता. पाचोरा जि जळगाव- (प्रतिनिधी ईश्वर खरे)-येथील जवळच असलेल्या जि प प्राथमिक शाळा, म्हसास, शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक-02/01/2026 वार शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल गंगाराम राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.विजयजी पवार साहेब, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री.समाधानजी पाटील साहेब, लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री.जि. ग. पाटील साहेब, गट साधन केंद्र समन्वयक श्री शिवदे सर, तसेच म्हसास तथा रामेश्वर गावाचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य,म्हसास, रामेश्वर गावातील माजी सरपंच,उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य, म्हसास, रामेश्वर गावातील पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, म्हसास, रामेश्वर गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षण प्रेमी, गावातील पत्रकार बंधू, तसेच लोहारा केंद्रातील शहापुरा शाळेचे मुख्याध्यापक श्री रत्नाकर पाटील सर, लोहारा कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री भुत्ते सर, कासमपुरा शाळेचे मुख्याध्यापक श्री परदेशी सर, लोहारा बॉईज केंद्र शाळेतील श्री कुमावत सर, श्री बागुल सर, बागुल मॅडम, ताडगे सर, सूर्यवंशी सर, नाचनखेडा जि प शाळेचे उपशिक्षक श्री पाटील सर, जि प शाळा साजगाव चे मुख्याध्यापक श्री दीपक पाटील सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन व फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर जाधव सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले. यानंतर व्यासपीठावरील व प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यानंतर श्री गणपती बाप्पाचे आव्हान पर नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर, ऐतिहासिक, बालगीत,भक्तीगीत, श्रीसेवालाल जी महाराज गीत,लावणी, दिंडी नृत्य, साउथ मिक्स इ.नृत्य, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी कष्टकरी नाटक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री विजयजी पवार साहेब यांनी कार्यक्रमाचे खूप कौतुक केले व चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले. तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा स्वागत सत्कारही केला.चिमुकल्या कलाकारांचे पालक बंधू भगिनींनी भरभरून बक्षीस देऊन कौतुक केले. या कार्यक्रमातच मान्यवरांच्या हस्ते शाळेतून बदली झालेल्या ज्येष्ठ भगिनी सौ.प्राजक्ता जळतकर मॅडम व सर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून ज्यांनी शाळेत सेवा दिली अशा श्रीमती अर्चना पाटील मॅडम यांचा ही स्वागत सत्कार करण्यात आला. शाळेसाठी नेहमी सहकार्य व मदत करणारे म्हसास, रामेश्वर गावातील शिक्षणप्रेमी व दात्यांचे शाळेच्या वतीने शब्दसुमानांनी व प्रत्यक्षदर्शी स्वागत करण्यात आले. कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम 2025- 2026 यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व पालक प्रतिनिधी यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले. सर्व मान्यवरांचे व कार्यक्रमातील बालकलाकारांचे अभिनंदन करून स्वागत करून, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, हुसेन साऊंड सिस्टिमचे संचालक श्री. आदिल शेख भाऊ शेंदुर्णी, व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केली असे भूषण शिवदे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचे योगदान लाभले अशा सर्वांचे सहर्ष आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










