Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/01/2026
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जळगाव-(प्रतिनिधी)- शहर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शंखनाद उद्या रविवारी, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिरात महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात येणार असून त्यानंतर प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य प्रचार प्रारंभ कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाब भाऊ पाटील, केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, मा. ना. संजयजी सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे (राजू मामा), आमदार मंगेश दादा चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार अमोल दादा जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. पवार) जिल्हाध्यक्ष संजय पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे नेते अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

यानंतर सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा येथे महायुतीची प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेस महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अ. पवार) व आरपीआय (आठवले गट)चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

Next Post
म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo